About narendra modi. Gujarat CM Narendra modi, Is best politician got for BJP. read his full history and work done in past.
नरेन्द्र मोदी
नाव : नरेन्द्र दामोदरदास मोदी
मतदारसंघ : मणीनगर
जन्म: १७ सप्टेंबर १९५० (वडनगर, जिल्हा – मेहसाना, गुजरात)
एक असा राजनेता जो ७ ऑक्टोंबर २००१ पासून गुजरात राज्याचा मुख्यमंत्री आहे. ऑक्टोंबर २००१ मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेन्द्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या नेतृत्व मध्ये भारतीय जनता पार्टी नि पहिल्यांदा डिसेंबर २००२ आणि त्यानंतर डिसेंबर २००७ च्या विधानसभा निवडणुकीत भारी बहुमतांनी विजय नोदाविला. नरेन्द्र मोदी “विकास पुरुष” च्या नावानी ओळखले जातात. आणि आज देशातील सर्वात लोकप्रिय राजनेत्यांमध्ये त्यांचा उल्लेख होतो. मोदींच्या नेतातृत्वात २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधान सभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते. नरेंद्र मोदींचा जन्म खूपच साधारण घरा मध्ये झाला होता. नरेन्द्र मोदी विद्यार्थी जीवनापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य झाले होते. ते अविवाहित आहेत. त्यांनी आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे मध्ये काम केले त्यानंतर संघासाठी पूर्ण वेळ प्रचारक बनले. सोमनाथ पासून ते अयोध्ये पर्यंत ते रथ यात्रेत लालकृष्ण आडवाणी यांच्या सोबत होते. नरेन्द्र मोदी आधी भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय मन्त्री आणि नंतर महामन्त्री झाले. केशुभाई पटेल च्या राजीनाम्यानंतर त्वरित गुजरात राज्याची भागदोड त्यांना सोपविण्यात आली. तेंव्हापासून ते आजपर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.
गोआ मध्ये झालेल्या भाजपा कार्यसमितिच्या बैठकीमध्ये नरेन्द्र मोदीना २०१४ लोकसभा निवडणूक अभियान चे दायित्व देण्यात आले. आणि दिल्लीतील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली.
खाजगी आयुष्य
एका सर्व साधारण कुटुंबामध्ये नरेंद्र मोदींचा जन्म झाला. ते शुद्ध शाकाहारी आहेत. भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धत त्यांनी स्वइच्चेनी आपल्या तरून वयात रेलवे स्टेशन वरून ये जा करणाऱ्या सैनिकांची सेवा केली. युवावस्था मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे मध्ये दाखल झाले. आणि सोबतच भ्रष्टाचार विरोधी नव निर्माण आंदोलनात भाग घेतला. एक पूर्णकालिक आयोजक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. किशोरावस्था मध्ये त्यांनी आपल्या भावासोबत एक चहाचे दुकान सुद्धा चालवले. नरेंद्र मोदिनी आपले शिक्षण वड़नगर मध्ये पूर्ण केले. नंतर त्यांनी गुजरात विश्वविद्यालय मधून राजनीति विज्ञान मध्ये डिगरी (एम॰एससी॰) घेतली.
राजनीतीची सुरवात
नरेन्द्र मोदी जेन्वा गुजरात विश्वविद्यात शिक्षण घेत होते तेन्वापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये नियमित पाने जात होते. याप्रकारे त्यांनी त्यांचे आयुष्य संघाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून सुरु केले.त्यांनी सुरवातीपासूनच राजनीती मध्ये आपली सक्रियता दाखविण्यास सुरवात केली. आणि भारतीय जनता पार्टीचा आधार मजबूत करण्यात महत्वाची भूमिका निभावली. गुजरात मध्ये शंकरसिंह वघेला यांचा जनाधार मजबूत करण्यात नरेन्द्र मोदी यांचीच रणनीति होती. एप्रिल १९९०मध्ये जेन्वा भारतात युती करण्यास प्रारंभ झाला तेंव्हा, नरेंद्र मोदीनि महत्वाची भूमिका केली. जेंव्हा गुजरात मध्ये १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी नि आपल्या स्वकर्तुत्वावर दोन त्रुतियौन्श मत प्राप्त केले नि सरकार स्थापन केले. त्याचवेळी देशात दोन राष्ट्रीय घटना घडल्या. पहली घटना म्हणजे सोमनाथ पासून अयोध्या पर्यंतची रथ यात्रा ज्यामध्ये आडवाणी चे प्रमुख सारथी म्हणून नरेन्द्र मोदिनी मुख्य जबाबदारी निभावली. त्याचप्रमाणे कन्याकुमारी पासून ते सुदूर उत्तर मधील काश्मीर पर्यंत मुरली मनोहर जोशी ची दूसरी रथ यात्रा पण नरेन्द्र मोदीच्या मार्गदर्शनामध्ये आयोजित करण्यात आली. या दोन्ही यात्रांमुळे नरेंद्र मोदींचे राजनीतिक जीवन उंचावण्यास फार मदत झाली, आणि त्यामुळेच शंकरसिंह वघेला यांनी पार्टीला राजीनामा सुद्धा दिला. आणि म्हणूनच त्यावेळी केशुभाई पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनविण्यात आले. आणि नरेन्द्र मोदीना दिल्लीला बोलावून केन्द्रीय मन्त्री बनविण्यात आले.
१९९५ मध्ये राष्ट्रीय मन्त्री च्या नात्यांनी त्यांना पाच प्रमुख राज्यात पार्टी संघटीत करण्याचे काम देण्यात आले. आणि ते त्यांनी उत्तम प्रकारे पूर्ण केले.१९९८ मध्ये त्यांना बढती देऊन राष्ट्रीय महामन्त्री (संगठन) चा अधिकार देण्यात आला.या पदावर ते ऑक्टोंबर २००१ पर्यंत काम करत होते.भारतीय जनता पार्टी नि ऑक्टोंबर २००१ मध्ये केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करून नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री बनविले.
गुजरातच्या मुख्यामंत्रीच्या रुपात
नरेंद्र मोदी आपल्या विशिष्ट शैलीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.त्यांच्या क्याक्तिगत स्टाफ मध्ये केवळ तीनच लोग आहेत.कर्मयोगी सारखे जीवन व्यतीत करणारे नरेंद्र मोदी स्वभावानी पण खूपच स्वाभिमानी आहेत, म्हणूनच त्यांना आपले काम करण्यास कुठलीही अडचण येत नाही. त्यांनी विकासासाठी कितीतरी हिंदू मंदिरे सुद्धा ध्वस्त करण्यास मागेपुढे पहिले नाही. जे सरकारी नियमानुसार बनले नवते ते सर्व त्यांनी ध्वस्त केले. म्हणून त्यांना विश्व हिन्दू परिषद सारख्या संघटनांच्या विरोधाला पण सामोरे जावे लागले. पण त्यांनी विकासासमोर कशाचाही विचार केला नाही.जे त्यांना योग्य वाटले ते तेच करत गेले. ते एक लोकप्रिय वक्ता सुद्धा आहेत, ज्यांना ऐकण्यासाठी लाखोंच्या संखेनी लोकांची गर्दी झालेली असते.
मोदींच्या नेतृत्वात झालेल्या २०१२ गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. भाजपा ला यावेळी ११५ सीटें मिळाली होती.
गुजरातच्या विकासाच्या काही योजना
मुख्यमंत्र्याच्या रुपात नरेंद्र मोदिनी गुजरातच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या त्यातील काही :
पंचामृत योजना – राज्याच्या एकीकृत विकासासाठी.
सुजलाम् सुफलाम् – राज्याच्या जल स्त्रोतांतील पाण्याचा योग्य वापर व्हावा म्हणून.
कृषि महोत्सव – सुपीक जमिनीसाठी कार्यशाळा.
चिरंजीवी योजना – नवजात मुलांच्या मृत्यू दारात कमी आणण्यासाठी.
मातृ-वन्दना – आई मुलांच्या स्वास्थासाठी.
बेटी बचाओ – भ्रूण हत्या व लिंगनिदान रोखण्यासाठी.
ज्योतिग्राम योजना – प्रत्येक गावात वीज पोचविण्यासाठी.,
कर्मयोगी अभियान – सरकारी कर्मचार्यात आपल्या कामाविषयी निष्ठा जागृत करण्यासाठी.
कन्या कलावाणी योजना – महिला साक्षरता व शिक्षा अभियान
बालभोग योजना – अनाथ मुलांना दुपारी जेवणाची व्यवस्था
Information about Gujrat CM Naradra Modi.
1 Comment. Leave new
Modiji is the only right candidate for PM place in India. we all must need to give him one change to become a PM of India. he has capability to be a PM. He is Great Man