Childhood The Best Part Of Our Life : It wasn’t always better when you were a kid, but there are things about sneakers—and sneaker culture—we miss. We always remember our Childhood.
लिहू वाचू आनंदे…
एका गोष्टीचे मला नेहमीच कुतूहल वाटते …. जेंव्हा आपण लहान असतो तेंव्हा आपल्याला मोठे व्हावेसे वाटते आणि मोठे झालो की पुन्हा लहान व्हावेसे वाटते. आहे की नाही गंमत. हे सुंदर विचार माझी बहिण स्मित पाठारे हिचे आहेत. खरंच सुंदर विचार स्मितने केला आहे असे मी म्हणेन. आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आपल्याला जास्त समजत नव्हते. आपली बालबुद्धी होती. आजी आजोबा, आई वडील, मोठी भावंडे हे काय काय करतात याकडे आपण लक्ष ठेऊन होतो. त्यावेळी मोठी माणसे जे जे करीत, ते ते आपण करावे असे आपणास वाटत होते. एका अर्थी त्यावेळी आपल्याला त्यांचा हेवा वाटत होता. आई बाजारात जाऊन भाजी आणते. आपणही एकटे जाऊन भाजी खरेदी करावी असे वाटत असूनही कुणीही आपल्याला भाजी आणावयास जाऊ देत नव्हते. वडील कार चालवितात म्हणून आपल्याला कार चालविता आली पाहिजे असेही आपल्या बालबुद्धीला वाटायचे. याकरिता त्या लहान वयात आपल्यला मोठे व्हावेसे वाटे. पण ज्यावेळी आपण मोठे झालो, नोकरी लागली, लग्न होऊन मुले झाली त्यावेळी आपल्याला पुन्हा लहान व्हावेसे वाटते. जर विचार केलात तर कळून येईल, समजेल की मोठ्याची दु:खे खूप आहेत, लहानपणात आता वाट्याला आलेली दु:खे नव्हती. कुठलीही काळजी नव्हती. खावे-प्यावे, मनमुराद मज्जा करावी, खेळ नी अभ्यास करावा. मोठेपणी हे लहानपणाचे आनंदी दिवस आठवतात आणि मोठेपणी वाटू लागते की आपण पुन्हा लहान होऊन बालपणात रमावे. म्हणूनच स्मित्चे विचार आपल्याला मनापासून पटतात. आपण काय सांगाल. हरी ओम.
प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, १३०९२०१३.