Bio and History of Rahul Gandhi: get detailed data of Rahul Gandhi, Education, college, Bio-data, Political career, birth place old and new name of Rahul gandhi.
राहुल गांधी
सांसद आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस कमिटीचे महासचिव
निर्वाचन क्षेत्र -अमेठी, उत्तर प्रदेश
जन्म-१९ जून १९७० (वय ४३)
नवी दिल्ली, भारत
राजनैतिक पार्टी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
शिक्षण – अर्जन रोलिंस कॉलेज (स्नातक)
कैम्ब्रिज विश्वविद्यालय (एम.फिल.)
राहुल गांधी (जन्म: १९ जून १९७०) एक भारतीय नेता आणि भारतीय संसदेचे सदस्य आहेत, आणि ते भारतीय लोकसभेच्या उत्तर प्रदेश येथील अमेठी या निर्वाचन शेत्राचे प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे महासचिव सुद्धा आहेत. राहुल गांधी हे भारताच्या प्रसिद्ध गांधी-नेहरू घराण्यातील सदस्य आहेत. राहुल गांधीना २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या विजयाचे श्रेय दिले जाते. त्यांच्या राजनैतिक रणनीति मध्ये खालच्या स्तरावरील राजनीतीला प्रोत्साहन देण्याचे काम प्रामुख्याने केले जाते. ग्रामीण भारतासोबत पार्टीचे संबंध दृढ करण्यावर त्यांचा भर जास्त आहे,आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकजूट करणे, लोकतंत्र मजबूत करण्याचा प्रयन्त करणे, राहुल गांधीनी अनुभवाच्या कमतरतेमुळे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद घेण्यास नकार दिला होता. आजकल राहुल गांधी आपला सर्व वेळ राजनीतिक अनुभव प्राप्त करने आणि पार्टी ला मुळापासून मजबूत करण्यात व्यतीत करीत आहेत.
राहुल गांधी चे सुरवातीचे जीवन
राहुल गांधी चा जन्म १९ जून १९७० ला नवी दिल्लीत भारताचे पूर्व पंतप्रधान राजीव गांधी आणि वर्तमान काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्या इथे झाला होता. ते त्यांच्या आईवडिलांच्या दोन मुलानामधून मोठे आहेत. त्यांच्या बहिणीचे नाव प्रियंका गांधी वढेरा आहे. ते भारताच्या पूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे नातू आहेत.राहुल चे सुरवातीचे शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न स्कूल मध्ये झाले, त्यानंतर ते प्रसिद्ध दून स्कूल मध्ये शिक्षणासाठी गेले. सन १९८१-८३ मध्ये सुरक्षेच्या कारणामुळे त्यांना त्यांचे शिक्षण घरूनच पूर्ण करावे लागले. त्यानंतर राहुल गांधीनी हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या रोलिंस कॉलेज फ्लोरिडा मधून सन १९९४ मध्ये कला शाखेतून पदवी प्राप्त केली. त्यानंतर सन १९९५ मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालयातील ट्रिनिटी कॉलेज मधून त्यांनी एम.फिल. हि उपाधि प्राप्त केली.
राहुल गांधीचे सुरवातीचे करियर
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी त्यांचे प्रबंधन गुरु माइकल पोर्टर यांच्या प्रबंधन परामर्श कंपनी मॉनीटर ग्रुप सोबत ३ वर्ष काम केले. त्या ३ वर्षामध्ये त्यांच्या सहकार्यांना व त्यांच्या कंपनीला पण हे माहित नव्हते कि ते कुणासोबत काम करीत आहे, कारण त्या कंपनी मध्ये राहुल गांधी रॉल विंसी या खोट्या नावानी काम करीत होते. त्यामुळे राहुल गांधीची भारतात खूपच आलोचना झाली आणि ते आजही त्याला तोंड देत आहे. पण हे सर्व त्यांच्या सुरक्षेसाठी हा उपाय केला असे कॉंग्रेस पार्टी सांगत असते. सन २००२ च्या शेवटी ते मुंबई मधील एका अभियांत्रिकी आणि प्रौद्योगिकी संबंधित आउटसोर्सिंग कंपनी बैकअप्स सर्विसेस प्राइवेट लिमिटेड चे सदस्य झाले.
राजनीतिक आयुष्य
२००३ मध्ये राहुल गांधीनी आपल्या राजनीतिक आयुष्याला सुरवात केली, राहुल गांधी च्या राष्ट्रीय राजनीति मध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावरून फार मोठा वाद निर्माण झाला होता, ज्याची राहुल गांधीनी कधीही दखल घेतली नाही. ते सार्वजनिक ठिकाणी आणि कांग्रेस पार्टीच्या बैठकीमध्ये त्यांच्या आई श्रीमती सोनिया गांधी यांच्यासोबत राहायचे. एक दिवसीय अंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका पाहायला ते एक सद्भावना यात्रेवर आपली बहिण प्रियंका गाँधी यांच्या सोबत पाकिस्तान पण गेले होते. जानेवारी २००४ मध्ये त्यांची व त्याची बहिण प्रियांका वढेरा यांच्या राजनीतिक प्रवेशाची चर्चा जोरात सुरु झाली त्यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांचे मतदारसंघ असलेल्या अमेठी चा दौरा केला, जो त्यावेळी त्यांच्या आई च्या नेतृत्वात होता. त्यांनी त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास हे सांगून नकार दिला होता कि, “मैं राजनीति के विरुद्ध नहीं हूँ। मैंने यह तय नहीं किया है की मैं राजनीति में कब प्रवेश करूँगा और वास्तव में, करूँगा भी कि नहीं”मार्च २००४ ला, मे २००४ ची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताच त्यांनी आपल्या राजनीतिक आयुष्याला प्रारंभ केला. ज्यात ते त्यांच्या वडिलांचे मतदारसंघ उत्तर प्रदेश येथील अमेठी मधून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले. या अगोदर त्यांचे काका संजय गांधी जे एका विमान अपघातामध्ये मरण पावले त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.राहुल गांधीच्या आधी हा मतदारसंघ श्रीमती सोनिया गांधी यांच्या आधिपत्या खाली होता. त्या वेळी राज्यातील ८० पैकी १० कॉंग्रेस पार्टी कडे होत्या, त्या वेळी उत्तर प्रदेश मध्ये कांग्रेसचे फार वाईट दिवस होते. त्या वेळी, पार्टी च्या या निर्णयावर राजनीतिक टीकाकाराणी आश्चर्य व्यक्त केले,कि राहुल गांधी पेक्षा त्यांची बहिण प्रियांका गांधी या जास्त यशस्वी होऊ शकतात. पार्टी च्या अधिकाऱ्यानजवळ मीडिया साठी CV तयार नव्हता, त्यांचा हा निर्णय इतका आश्चर्यकारक होता कि, त्यामुळे त्यामुळे इतक्या चर्चा उत्तपन झाल्या कि भारताच्या सर्वात सामर्थ्यशाली राजनीतिक कुटुंबातला एक युवा सदस्य राजनीतीमध्ये आल्यामुळे भारताची युवा मंडळी कॉंग्रेस पार्टी कडे आकर्षित होऊन कांग्रेस पार्टी च्या राजनीतिक आयुष्याला एक संजीवनीच प्राप्त होईल. विदेशी मीडिया सोबत झालेल्या आपल्या पहिल्या मुलाखती मध्ये, त्यांनी देशाला जोडणाऱ्या माणसाच्या रुपात स्वताला मिडिया समोर ठेवले, आणि भारताच्या “विभाजनकारी” राजनीति ची निंदा केली, त्यावेळी त्यांनी असे म्हटले कि जातीय आणि धार्मिक तनाव कमी करण्याचा प्रयन्त करणार. त्यावेळी त्यांच्या उमेदवारीचे स्तानिक लोकांनी खूप जोरदार स्वागत केले, ज्यांचा या शेत्रात या परिवारासोबत एक फार जुना संबंध होता. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे नेता, त्यावेळी त्यांनी आपल्या विरोधी प्रतिस्पर्ध्याला १,००,००० पेक्षा जास्त मतांनी पराभूत करून आपल्या परिवाराचा गढ राखला, त्यावेळी कांग्रेस ने सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी ला अप्रत्यक्षपणे पराभूत केले. त्यांचे हे अभियान त्यांची लहान बहिण प्रियंका गाँधी द्वारा संचालित केले होते. २००६ पर्यंत त्यांनी कोणते हि पद ग्रहण केले नाही,त्यांनी त्या काळात आपल्या मतदारसंघातील विकास आणि उत्तर प्रदेश च्या राजनीतीवर लक्ष केंद्रित केले. आणि त्यावेळी भारतीय आणि अंतरराष्ट्रीय मिडिया मध्ये अशा चर्चा सुरु झाल्या कि सोनिया गांधी भविष्यत राहुल गांधीना राष्ट्रीय स्तराचा नेता बनविण्यासाठी प्रयन्त करीत आहेत.जानेवारी २००६ मध्ये, हैदराबाद मधील भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या एका संमेलनात, पार्टी च्या हजारों कार्यकर्त्यांनी राहुल गांधीना पार्टी मध्ये एक महत्वपूर्ण भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि त्यांना संबोधित करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी म्हटले कि, मी तुमच्या भावनांचा आणि तुम्ही मला केलेल्या समर्थनच आभारी आहे, मी तुम्हाला वाचन देतो कि मी तुमच्या भावनांचा भ्रमनिरास करणार नाही”, पण त्यासाठी आपल्याला धैर्य ठेवायला हवे, आणि मी आताच कोणतीही मोठी भूमिका वठवण्यास तयार नाही आहे. राहुल गांधी आणि त्यांची बहिणींनी २००६ मध्ये रायबरेलीत पुन्हा सत्तारूढ़ होण्यासाठी त्यांच्या आई श्रीमती सोनिया गांधी यांच्यासोबत प्रयन्त केला आणि त्यावेळी त्या ४,००,००० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या.