बंधन आणि मुक्ती
Like
Like Love Haha Wow Sad Angry

“Bandhan and Mukti” Marathi article based upon the freedom and slavery. we all need Freedom, Come out form the cage of slavery. Bandhan Ani Mukti.

freedom and slavery

मनुष्याची सफल जीवन यात्रा यातच आहे की त्याला खरा अमर्याद आनंद  प्राप्त होणे. पण जीवनात जेही सुख किंवा आनंद मिळतात ते क्षणभंगुर ठरतात. येणाऱ्या सुखांना आपण कितीही सांभाळून ठेऊ इच्छीले तरी ते फार थोड्या वेळाचे असतात टिकून राहात नाही. कारण बाहेरून मिळणारे सुख कोणत्यातरी निमित्ताने आलेले असतात.ते निमित्त टिकाऊ नसते. जशी मनुष्याचे आयुष्य एक सारखे व टिकाऊ नाही. देहातील शक्ती,इंद्रियातील शक्ती हि सुद्धा सारखी व टिकाऊ नसते. यात जसा बदल होत जातो तसाच निमित्ताने येणारे सुख व आनंद कसा टिकून राहणार ? मनुष्याला जे काही बाहेरून प्राप्त होईल ते टिकाऊ नसतेच. म्हणून त्याला जीवनाच्या सफलते साठी अशी वस्तूची गरज आहे कि त्यात आनंद वाटेल व त्यापासून दूर होणार नाही.

प्राणी आणि पदार्थात तसेच किती तरी प्रकारच्या कर्मात मनुष्य जन्मापासून बांधला असतो. उदा. एखादा कागदाचा तुकडा घेऊन त्याला दोरा बांधून मोकळ्या जागेवर सोडून दिल्यांनतर काही दिवसांनी त्याला आपोआप गोलाकार येतो. याच प्रमाणे आपले मन बाहेरच्या तुष्णेने गोलाकार रूप घेतो. लहानपणी आपली  बुद्धी,विवेक, ज्ञान तेवढे जागृत नसते. जिकडे चांगे वाटते तिकडेच मन भटकते.  दु:ख वाटते ते नको असते सुख वाटते ते हवे हवेसे असते. नको असते त्याचा राग येतो द्वेष वाटते नको असलेल्याच वस्तूचे चिंतन सुरु होते, त्याच प्रमाणे जीवनात द्वेषभावनेने, बंधन पडत जाते. हेच राग-द्वेष, कामक्रोध याच चक्कर मध्ये मनुष्याचे जीवनभर दु:ख भोगत राहतो. जो पर्यंत त्याचा विवेक जागृत होत नाही तो पर्यंत प्रकृती सांभाळणे कठीण होते. हि प्रकृती दिसूनही पडत नाही, व शांत ही होत नाही.  हीच प्रकृती आपल्या नियमा नुसार मशीन प्रमाणे चालत राहते, हीच प्रकृती सार्या विश्वाला उत्पन्न करते, स्थिर करते व नाश करते. सतत वाहत राहणारी कृती म्हणजेच ”प्रकृती”.

प्रकृतीची  सदा न कदा काही तरी कृती सुरूच असते.हीच ईश्वराची माया होय. आनंद, चेतन, ज्ञान हे कोऱ्या कागदा प्रमाणे आहे.

परंतु हि माया त्याला अश्या चक्राने फिरविते कि प्रत्येकाला त्याचे निरनिराळे रूप दाखविते. मनुष्य, प्राणी, वृक्ष-वेली हे सर्व परिवर्तनशील आहेत यांची अवस्था अगदी बदलत असते, हे स्वाभाविक आहे.

परंतु मनुष्या वरील बंधन फार मजबूत आहे. माया म्हणेल प्रेम करा तर प्रेम करू माया म्हणेल वैर करा  तर वैर करू. मान मोह, राग, द्वेष, संशय, भय, किंवा खोटे कर्म तेही करू. परंतु या बंधनात बाहेरील सुखात मनुष्य आतून खोकला होऊन जातो.

हे लक्षातही राहात नाही. यात मनुष्याचा श्वास सुद्धा सुखाने चालत नाही, आणि इंद्रिय हि बरोबर काम करीत नाही. त्या शरीरात सुख नाही त्याला कितीही धन-दौलत,मित्र-परिवार, आदर-सत्कार, गौरव-अधिकार प्राप्त होत असतील त्याला काहीच अर्थ उरत नाही. काही काळ बरे वाटेल. परंतु एक क्षण असा येतो कि, सर्व सुख, धन, परिवार राहूनही त्याला ते नकोस वाटायला लागेल, कारण त्या सुखा मागोमाग तेवढेच दु:ख प्रगट होतात. शेवटी तोच मनुष्य म्हणतो , कि आता मला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे. आता मला याच्यात काही सुख नाही. हा प्रकृतीचा नियम आहे, त्यावर फिरणाऱ्या मायेचा खेळ होय. या खेळात मनुष्य ईतका उत्साहित होतो. या बाहेरील आनंदात तो हे विसरून जातो त्याच्या अंतरात्मातील ज्ञानशक्ती तेवढ्याच तेजीने भटकलेली आहे. आणि क्रियाशक्ती ही भटकलेली आहे.  ज्ञानशक्ती द्वारा त्याला जे जाणायचे होते त्यावर श्वास कधी केंद्रित झालाच नाही.

जे सुख मानून बसलो त्यातच श्वास भटकला. हे जाणले कि हा माझा वैरी आहे, त्यावर क्रोध आला, कधी हे जाणले कि यात माझी भलाई आहे त्याला दोस्त मानला जे समजत गेलो त्यावरच कामदेवाने काम केले, ज्ञानदेव दूर भटकले त्यातच जीवन संपूर्ण गमावले हीच बंधने मनुष्याला दु:खावस्थेत घालतात.

 कधी कधी मनुष्य म्हणतो कि चिंता सोडून देतो. परंतु ती सोडणे काय त्याच्या हाती आहे ? मन एवढे बंधनात असते, बंधनात असलेला मन ज्या रस्त्याने वळते तिकडे मनुष्य जातो. पण या जखडलेल्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न झाला. तर काय गाढ झोपेतल्या स्वप्नातून एकदम जागा झाल्यागत. अरे हे तर स्वप्नच होते हे समजून सत्याच्या मार्गावर वाटचाल करू शकतो पण त्यासाठी आपली ईच्छाशक्ती प्रबळ व्हायला हवी.

या साठी उत्तमगती म्हणजे ज्ञान आणि त्याची भटकत असलेली शक्ती हे एकत्रित होऊन आपल्या देहात या दोन शक्तींचे प्रतिनिधी असलेले म्हणजे समज आणि प्राणशक्ती हि बाहेर भटकायला नको.

कधी कधी हि प्राणशक्ती भटकली की मनुष्याला भर युवा अवस्थेत सुद्धा झोप येत नाही. त्याच सोबत त्याची प्राणशक्ती व क्रियाशक्ती भटकलेली असते. त्याला सुद्धा झोपेसाठी गोळ्या खाव्या लागतात. याचा परिणाम म्हणजे  हृद्य रोग, पोटातील रोग उत्पन्न होतात. या बिमारीत मनुष्य प्राण सुद्धा गमाउन बसतो. या बंधनाला तोडण्यास मनुष्याने जप, प्राणायाम याचा अवश्य लाभ घ्यावा. त्यामुळे ज्ञान बंधनात पडतो. या ज्ञानाद्वारे आपले निकामी कर्म बंधनातून तुटू लागतात, व्यक्तीला अंतरात्मा- मातील सत्यज्ञानाची प्रचीती होण्याचा लाभ होतो. तेव्हा जप-तप, प्राणायाम हेच शुद्धज्ञान प्राप्त करून देते.

“Bandhan and Mukti” Marathi article based upon the freedom and slavery. we all need Freedom, Come out form the cage of slavery. Bandhan Ani Mukti.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu