पुन्हा एकदा लालकृष्ण आडवानी यानि नरेन्द्र मोदिंचे गुणगान गायले. त्यानी आज मोदिंचे तोंड भरुन कौतुक केले, त्यानी म्हटले की, प्रत्येक गावाला २४ तास वीज देणारे पहिले राज्य नरेंद्र मोदींचे गुजरात आहे. अशा शब्दांत लालकृष्ण आडवाणींनी नरेंद्र मोदींची स्तुती केली आणि भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष नसल्याचे संकेत दिले. याचवेळी मात्र नरेंद्र मोदींनी लालकृष्ण आडवाणी यांना वाकून नमस्कार केला आणि त्यावेळी मात्र आडवाणी यांनी चक्क दुर्लक्ष केल्याचे व आशीर्वाद दिला नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे भाजपामधला अंतर्गत संघर्ष संपला नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समझोता करण्यात आल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्याच वेळी मात्र आडवानी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या कार्याचे कौतुक करण्यास विसरले नहीं.
मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे भाजपने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी दोघेही पहिल्यांदा एका मंचावर आले होते. या मेळाव्याच्या सुरुवातीला भाषण करताना आडवाणींनी मोदींसह भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या कामांचे कौतुक केले. भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु असून यंदाची निवडणूक भाषणांमुळे नव्हे तर विकासकामांच्या आधारे जिंकू असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी यावेळी व्यक्त केला.
एका मंचावर येऊनही आडवाणी – मोदी दूरच राहिले भोपाळच्या सभेनिमित्त मोदी व आडवाणी एका मंचावर आल्याने त्यांच्यातील दुरावा मिटणार असे अनेकाना वाटले होते. पण त्से कही झाले नाही. आडवाणीं मंचावर आल्यानंतर त्यानी मोदींना पुष्पगुच्छ देऊन त्याना शुभेच्छा दिल्या, मात्र त्यांच्या देहबोलीतून अद्यापही ते नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. जवळजवळ बसूनही दोघानी एकमेकांशी संवादही साधला नाही. यावरून त्यांचा आतंरिक वाद अजुनही संपला नाही हे स्पष्ट दिसून येत आहे.