राज ठाकरेंची आबांवर सडकून टीका




राज ठाकरेंची आबांवर सडकून टीका

 

राज ठाकरे पुन्हा मैदानात :
आबांना बांगड्या पाठवा – राज ठाकरे
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील असून राज्यातील महिला भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भरून त्यांना पाठवाव्यात. जेवढे जास्त बॉक्स जातील तेवढी लाज वाटून तरी ते राजीनामा देतील, असा सणसणीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली
काल मुंबईत एका प्रशिणार्थी महिला पत्रकारावर सामुहीक बलात्कार झाला. या प्रकरणी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील सर्व पक्षांना माझे आवाहन आहे, महाराष्ट्रातील जनतेला माझे आवाहन आहे. आज व्यक्ती बदलणं गरजेचं आहे, उद्या सरकार बदलणं गरजचं आहे. परंतु, ही व्यक्ती आत्ताच बदलणं गरजेचं आहे. त्या शिवाय हे वठणीवर येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेचा रेटा जोपर्यंत यांच्या मागे लागणार नाही तो पर्यंत यांना काही वाटणार नाही. हे रोजचं आहे, तुम्ही जगा किंवा मरा याचं काही देणं घेणं नाही. निवडणुकीच्या दिवसापर्यंत जीवंत राहा. मतदान केल्या केल्या मेलात तरी चालेल. असल्या वृत्तीची माणसं संपूर्ण महाराष्ट्र चालवत आहे. लाज वाटते आज. दाभोलकरांसारखी व्यक्ती गेली आज बलात्कार उद्या काय होईल सांगता येत नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड