पोपट हा चित्रपट दिनांक ऑगस्ट २३ , २०१३ आपल्या करिता सिनेमा गृहात आला . यात दिग्दर्शक सतीश राजवाडेने थेट खेडेगावातली गोष्ट पडद्यावर आणलीये.हा चित्रपट पडद्यावर कशा प्रकारे आणतोय, याची याची उत्सुकता सर्वांना होतीच. या चित्रपटाच्या यशाची ही नौका पार करताना मुख्यतः कलाकारांचा अभिनय हीच जमेची बाजू म्हणावं लागेल. कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे या चित्रपटाला चार चांद लागले आहेत.
‘पोपट’ची कथा काय आहे?
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुलथे गावातल्या तीन मित्रांची ही गोष्ट आहे. ‘काय बी झालं तरी गड्यांनु, आपला पोपट कुठंबी व्हता कामा नये’, असा या त्रिकुटाचा फंडा असतो. अगदी जीवाभावाचे हे मित्र. यातल्या एका मित्राला सिनेमाता काम करण्याची भारी आवड असते. मुंबई-पुण्यातल्या लोकांच्या सिनेमाचं शूटिंग त्यांच्या गावात होतं. त्यावेळी हा मित्रही त्यात भाग घेतो. मात्र त्याचा झालेला अपमान या मित्रांना सहन होत नाही. आणि हे तिघेजण स्वतःच सिनेमा काढायचं ठरवतात. मात्र त्यांच्याकडे कॅमेरामन कोणीच नसतो. म्हणूनच जना उर्फ जनार्दन (अतुल कुलकर्णी)च्या रुपानं त्यांना चौथा मित्र भेटतो आणि ही ‘शिनेमा’ची कथा आणखी फुलत जाते. तर मग सिनेमा काढताना आणि तोही एड्ससारख्या संवेदनशील विषयावर… त्यांना काय-काय कसरती कराव्या लागतात हे पाहणं मनोरंजक ठरतं…
खाली आपण चित्रपटाची माहित बघूया :
Producers : Mirah Entertainment Pvt. Ltd and Citrus Check Inns
प्रस्तुती : मीराः इंटरटेण्मेंट
Director : Satish Rajwade
दिग्दर्शन: सतीश राजवाडे
Writer : Satish Rajwade
लेखन : सतीश राजवाडे
Cast : Atul Kulkarni, Siddharth Menon, Ketan Pawar, Amey Wagh, Anita Date, Neha Shitole, Megha Ghadge
कलाकार : अतुल कुलकर्णी , सिद्धार्थ मेनन , केतन पवार, अमेय वाघ , अनिता दाते , नेहा शितोळे , मेघा घाडगे
Music : Avinash-Vishwajeet
संगीत: अविनाश विश्वजित
Genre : Comedy
विभाग : गमती
Release Date : August 23, 2013
दिनांक ऑगस्ट २ ३ , २ ० १ ३