बाळ गंगाधर टिळक




बाळ गंगाधर टिळक

भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता
लोकमान्य टिळक
जन्म : २३ जुलै १८५६ (चिखलगाव, रत्नागिरी)
मृत्यू  : १ ऑगस्ट १९२० (मुंबई)
नाव   : बाळ गंगाधर टिळक

भारतीय स्वतंत्र लढ्यात ज्यांनी आयुष्य वेचल त्यामध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. कारण या थोर महात्म्यांनी तरून वयातच समाज सुधारण्यासाठी व समाज ऐक्यासाठी जिद्दीने पाऊले उचलली. देशभक्तीच्या आलोट प्रेमासाठी स्वदेशाचा नारा देशभर पसरवला. समाज जागृतीसाठी लेखणी आवश्यक असल्याचे चाणाक्षपणे ओळखून “केसरी” व “मराठा” यासारखी वृतपत्रे सुरु केली.
जहालमतावाद्यांचे लोकमान्य टिळक हे नेते बनले. ” स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, व तो मी मिळवणारच ” अशा प्रयन्तवादाचा जनक लोकमान्य टिळक. समाज तर सुधारलाच पाहिजे, पण प्रथम स्वातंत्र्य आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.
शिक्षणाची माणसाच्या आयुष्यात अतिशय निकडीची गरज आहे. ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. मोडेन पण वाकणार नाही अशी त्यांची स्वराज्यासाठी मनापासून तयारी होती. समाज जागृती व हिंदू मुस्लिम ऐक्ययासाठी अनेक प्रकारचे ध्येयवादी प्रयोग त्यांनी केले. परकीय सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाची अनेक वेळा ओळख करून दिली. लोकमान्य टिळक स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर लढले. आजही आपण त्यांचे अभिमानाने नाव घेतो.

Bal Gangadhar Tilak (Indian political leader): born as Keshav Gangadhar Tilak, was an Indian nationalist, journalist, teacher, social reformer, lawyer and an independence activist. He was the first popular leader of the Indian Independence Movement.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2093




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड