उपवास आणि आरोग्य




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Fasting is really helpful for your body metabolism, read here The Health Benefits of Fasting in details.

The Health Benefits of Fasting

अग्निमाद्य आणि अजीर्ण या दोहोंवर उत्तम उपाय म्हणजे लंघन. आपल्या देशींच्या प्राचीन आरोग्य शास्त्रकारांनी आरोग्य रक्षणाची काही उपयुक्त तत्वं धर्माच्या अवगुंठ्नाखाली अक्षरश: लादली होती. कारण त्याशिवाय ‘जिव्हालौल्याच्या प्रज्ञांप्राधा’ ला अटकाव होणार नाही याची त्यांना खात्री असावी. धर्मशास्त्रांतले उपवासाचे दिवस म्हणजे आठवडा, पंधरवडा, महिन्यातून करावयाचे लंघनच ! उपवासान अजीर्नाला आळा तर बसतोच. पण शरीरात ‘आम’ झाला असेल तर तोही दूर होतो. मात्र त्या उपवासाचा ‘उपहास ‘होता कामा नये.

उपवास प्रकृतीला सोसवेल असाच धरावा. पित्त प्रकृतीच्या लोकांना उपवास अयोग्यच. म्हणून महिन्यातून एकदाच ‘संकष्टी’ करायला काहीच हरकत नाही. या उलट कफाच्या व्यक्तींनी आठवड्यातले वाराचे उपवास जरूर धरावे. मात्र उपवास हा अधिक काळ असता कामा नये. कारण त्याने धातू क्षीण होतीलच. शरीरातल्या अग्नीला अन्ना द्वारे इंधन अपुरं पडल तर धातूच त्याला फुलवतात. म्हणून उपवास ‘मोडरेट’ असावेत.  कारण उपवासाचा उद्देश दोष ‘सम’ करण्याचा, बिघडलेली लय साधण्याचा असतो.

ही लय साधताना ऐक लक्षात ठेवायला हवं. ते तत्व म्हणजे शरीरातल्या क्षीण अग्नीला हळूवारपणे फुंकर घालत चेतवायचं आहे. थोड थोड इंधन घालून फुलवायचं आहे. म्हणूनच अशावेळी उपवासाच्या निमित्ताने पचायला जड असे पदार्थ खाण म्हणजे मंदावत असलेल्या अग्नीवर अधिक बोजा टाकणं आहे. शेंगदाणा, साबुदाणा, बटाटे, गुळ अशा पदार्थांचा उपवासाच्या पदार्थानमध्ये सामावेश करून उपवासाचा मूळ उद्देश लुप्त झाला आहे. दुध, साखर, केळी, दही हे खाद्य पदार्थही अग्नीला मारकच! खारीक, बदामाची खीर, साबुदाण्याची खीर अशा खिरी गोड आणि गुरु म्हणजे पचायला जड.

उपवासाला पदार्थ खावे ते पचायला हलके असे. याच  अस्म कि ‘रुक्ष’ पदार्थ म्हणजे शुष्क, सुक्या गोष्टी पचायला सोप्या असतात. राजगिऱ्याच्या लाह्या, भगर, ताक यावर उपवास भागवता आला तर उत्तमच. साबुदाणा खावासा वाटला तर ताकात कालवलेला, मीठ घातलेला चांगला पचेल, दाण्याचा कुट, खोबर घातलेली खिचडी जड पडेल. धर्म शास्त्रान हळद, हिंग, मेथ्यांना उपवासा पासून कधी उडवील कळायला मार्ग नाही. पण ज्यांना उपवास करून स्वार्थ-परमार्थ साधावयाचा असेल, म्हणजे प्रकृतीच्या कारणास्तव एखादा उपवास करावयाचा असेल. त्या सुंठ, मेथी, हळद, हिंग या मसाल्याच्या पदार्थांचा उपवासाच्या पदार्थान मध्ये अवश्य उपयोग करावा. कडू, तुरट, तिखट या चवींचे (रसाचे) हे पदार्थ वाढलेल्या कफदोषांच व्यवस्थित पचन करतात. आता आठवून बघा ‘कफ’ हा मधुर रसांचा आहे. आणि कडू, तिखट, तुरट हे विरुद्ध गुणांचे पदार्थ त्याला आटोक्यात ठेवतात. फार सोप तत्व आहे. उर्जा चेतवायची म्हणजे अग्नी व वायू हवा. म्हणजे पित्त आणि वात दोषांच काम व्यवस्थित हवं. पण जलमहाभूतांचा अंश असलेला कफ मात्र काबूत राहायला हवा. कफ हा स्निग्ध असतो. म्हणून त्याविरुद्ध रुक्ष गुणाच्या लाह्याही उपयोगी. कधी तर असेही वाटते, कि राजगिऱ्याच्याच का,ईतर धान्याच्या लाह्या सुद्धा उपवासाला खायला काहीच हरकत नसावी. आणि उपवासाला तर दुध चालतंच. त्यात सुंठ, हळद घातली तर पचायला अधिकच हलकं आणि प्रकृतीला पोषकही होतं. उपवासाला औषध घेण्याची साधारणत: पद्धत नसते. पण औषध म्हणून नाहीतर आजच्या नवीन पद्धतीत ‘फूड सप्लीमेंट’ म्हणून उपवासाच्या दिवशी बाळ हिरडा खावा. हिरडा हाही रुक्ष गुणाचाच आहे.तो भाजून घ्यावा. किंवा तुकडे करून ते तुपात तळून घ्यावेत व चोखावेत. म्हणजे पोट साफ होऊन पचन क्रिया सुरळीत होईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu