(शिव पुराण) पार्वती स्वयंवर!

Like Like Love Haha Wow Sad Angry ज्या वेळी हिमालयाने पार्वती स्वयंवर रचले त्यावेळी सर्व देव,नाग,किन्नर एकत्रित होऊन आपापले आसन...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

The Shiva MahaPurana (Sanskrit: शिव पुराण, Śiva Purāṇa) is one of the purāṇas, a genre of Hindu religious texts, dedicated to Shiva.ज्या वेळी हिमालयाने पार्वती स्वयंवर रचले त्यावेळी सर्व देव,नाग,किन्नर एकत्रित होऊन आपापले आसन ग्रहण केले. त्यावेळी शिवप्रभुणे एक लीला केली व बालकाचे रुप पालटून त्यांनीही आंसन ग्रहण केले. त्यां बालकाचा व्यवहार बघून सर्वच क्रोधीत होऊन त्यावर प्रहार करायला लागले. पण बालक साधारण नसल्याने त्या बालकाने सर्वांचे अस्त्र शस्त्र कुंठीत केले. त्यावेळी हे प्रकार बघून ब्रम्हदेव ज्ञानपूर्वक विचार ज्ञात करू लागले व त्यांच्या लक्षात आले कि हे साक्षात महादेव आहेत. आणि ते त्यांच्या चरणाशी नतमस्तक झाले व स्तुती करू लागले. हे प्रभू तुम्हीच ईश्वर आहात. तुम्हीच बुद्धी, तुम्हीच अहंकार, तुम्हीच बलशाली आहात, तुम्हीच सर्व  प्राणीमात्रांचे  इंन्द्रिय प्रवर्तक आहात !  हे सृष्टीकर्ता मी तुमचा अंश आहे,आणि नारायण तुमचाच अंश आहे, हे सृष्टीकारण  देवी पार्वती- प्रकृतीस्वरूप सर्वजगत, कारण स्वरूपा आपलीच पत्नी आहे, हे महादेवा तुम्हाला बारंबार नमस्कार आहे, मी तुमच्या आदेशा नुसार सर्व प्रजा, आणि देवतांचे सृजन केले आहे. तेव्हा हे सर्व आपल्यावर मोहित होऊन मुढताला प्राप्त झाले आहे, तरी आपण कृपा करून अनुग्रहाणे यांना पूर्ववत करावे. ब्रम्हांजी च्या स्तुतीने, विनंतीने महादेव प्रसन्न झाले व सर्व देव-देवता यक्ष किन्नर यांना पुष्ट केले. यावरून सदाशिवा शिवाय श्रेष्ठतर व उच्च कोणीच होऊ शकत नाही. सृष्टी, प्रकृती, मुक्ती त्यांचे स्वरूप होय. ब्रम्हदेव यांचे निम्लीखीत वाक्य म्हणतात ‘हे विष्णू तुम्ही आणि भगवती पार्वती शिवप्रभूच्या वाम अंगातून उत्पन्न झाले आहात. त्यांच्याच कृपा प्रसादाने देवी पार्वती हिमालय कन्या रूपाने प्रगट झाली. आणि सर्व जगतमाता व प्रभू शिव परमपिता आहेत. शिवजीच्या मूर्ती पासून हे सर्व जीवजंतू मनुष्य -प्राणी मात्र उत्पन्न झाले आहेत. तसेच भूमी, जल, वायू, आकाश, सूर्य, चंद्र या शिवाच्याच मूर्ती होत. तसेच पार्वती शुक्ल, कृष्ण, लोहित वर्णयुक्त माया आणि प्रकृतीरूप आहे.  हिमालय आणि शिवजीच्या वचना नुसार पार्वती देवी व  महादेवानां योग्य आहे. तेव्हा विष्णूदेव यांच्या हस्ते विधिवत पार्वती महादेवानां अर्पण झाली.

Note: Swayamvara Parvathi: Most Powerful, trusted, widely used Marriage Mantra for early marriage, fertility (to conceive child) and happiness. Swayamvara Parvathi Yantra is a key to happy married life. The Yantra for love is your magic weapon to cherish your marital bliss for ever.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories