‘बालक पालक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर मराठी चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असलेला रितेश देशमुख आता लवकरच मराठी प्रेक्षकांना ‘लई भारी’ या मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. मुंबई मंत्रा आणि सिनेमंत्रा या संस्थांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा सहनिर्माता सुद्धा आहे. त्रपटात रितेश प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट भरपूर ऍक्शन आणि मनोरंजक असणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असलेला तमाम मराठी प्रेक्षक चित्रपट पाहून नक्कीच म्हणतील ‘लय भारी’.