गर्भवतीच्या भावना आणि गर्भ विकास
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Pregnancy and foetal growth .Get Pregnancy Week by Week, Pregnancy Information for you, care for pregnant women in during pregnancy period. read more about See how your baby is growing week by week throughout your pregnancy with fetal development.

thinking positivelly in pregnancy

होमिओपॉथिक जेनेटिक आजाराचा उपचार करताना बाळाच्या आईचा गर्भावस्थेचा मानसिक व भावनात्मिक अभ्यास केला जातो. याच पार्श्वभूमीवर त्या आजारांवर औषध निवडून पेशंटला औषध दिले जाते. मनात आणि भावनांचा शरीरावर होणारा प्रभाव याला सायकोसोमॉटीक असे म्हणतात. ‘सायको’ म्हणजे ‘मन’ आणि ‘सोमा’ म्हणजे ‘शरीर’ गर्भवती तेव्हा कुठल्या स्ट्रेस मध्ये असते तेव्हा तिच्या शरीरात ‘कॉर्टीसॉल’ नावाचे  ‘संप्रेरक’ तयार होतात. हे स्ट्रेस हार्मोन्स तिची प्रतिकार शक्ती कमी करतातच.परंतु बाळापर्यंत पोहचून बाळाच्या प्रतिकार शक्तीवर आणि विकासावर वाईट प्रभाव टाकतात. जेनेटिक आहार किंवा जन्मत: असणाऱ्या आजारांनी जन्मलेल्या बाळाच्या आईच्या गर्भावस्थे दरम्यान भावनांचा अभ्यास केला तर १० पैकी ८ माता निश्चितच कुठल्यातरी स्ट्रेस मध्ये होत्या असे दिसून आले. या मध्ये चिंता, भीती, निराशा, असामानाधान, मानसिक कटकटी, एकटेपणाची भावना, असुरक्षितता वै. दिसून आले.

**  काय संबंध असेल आईच्या गर्भावस्थेतील भावनांचा आपल्या गर्भातील बाळासोबत ?
**  याचा काय परिणाम तिच्या बाळावर होत असेल ?
**   भविष्यातही बाळाच्या जीवनावर याचे कुठले पडसाद उमटतात ?

या बद्दल सांगताना असोशिएन ऑफ प्रीनेटल व पेरीनेटल व सायकोलॉजी ऑफ हेल्थचे थोमन व्हर्नी सांगतात कि, गर्भवती स्त्रीचे विचार गर्भातील बाळा सोबत शारीरिक पातळीवर जुळलेले असतात. गर्भावस्थेत ज्या सर्व काही गोष्टींची जाणीव गर्भवतीला होते आणि ज्या गोष्टींचा विचार ती करते ते सर्व काही न्युरोहार्मोन्सच्या माध्यमातून तिच्या गर्भातील थेट बाळापर्यंत संबंध प्रस्थापित करतात. त्याच्या मेंदूवर प्रभाव करतात. भावना म्हणजे काय ? तर मेडिकल डिक्शनरी अनुसार भावना म्हणजे मानसिक व शारीरिक स्थिती या भावने सोबत काही हार्मोन्स व ईतर घटक जुळलेले असतात. ‘शारिरीक व मानसिक स्थितीतील दरी जोडताना आपल्या मनातील विचार ज्याची जाणीव आपल्याला होते ते म्हणजे भावना’ अशा प्रकारे गर्भवती स्त्रीच्या भावना म्हणजे ती तिच्या गर्भावस्थेला कशा प्रकारे बघते,येणार्या बाळा बद्दल तिची तयारी,तिचे घरातील सर्वांसोबत असलेले संबंध तिचे काम आणि आरोग्य व ईतर बऱ्याच गोष्टीच्या एकत्रित परिणामातून निर्माण होत असतात. गर्भवती मातांचे विचार हें तिच्या मध्ये तिच्या भावनांना जागृत करतात. तर तिच्या भावना या तिच्या मधून पुढे बाळापर्यंत पोचविण्या करीता तयार होणाऱ्या न्युरोहार्मोन्सला जागृत करतात असे डॉ. थोमस व्हर्नी यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केले आहे. गर्भावस्थेवर झालेल्या बऱ्याच संशोधना मध्येही हे सिद्ध झाले आहे. त्या सर्व प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे की जेव्हा गर्भवती माता हि चिंतातूर, दु:खी, अथवा कुठल्याही दडपणा खाली, किंवा भीतीदायक स्थितीत असते, तेव्हा सुरवातीला सांगितल्याप्रमाणे काही स्ट्रेसहार्मोन्स हे तिच्या रक्तात निर्माण होतात व तिच्या रक्तातून ते आवळचा  अडथळा पार करून बालापर्यंत पोचतात. व याचा परिणाम बाळाच्या विकसित होणाऱ्या मेंदूवर व शरीरावर करतात. म्हणून याची जाणीव गर्भवतीने आधीच करून घेतली तर या भावनांवर आळा घालण्यास तिला बर्याच अंशी मदत होईल, आणि याच अनुषंगाने बाळाला मदत करू शकेल.

सकारात्मक विचार

आपले म व आपल्या भावना म्हणजे केंद्र व आपले शरीर म्हणजे त्या भोवतालचे वलय ज्या प्रमाणे एक कोळी (स्पायडर) आपले जाले मध्यभागी राहून नियंत्रित करतो. त्याच प्रमाणे आपले मन हे शरीराचे केंद्र बिंदू असून आपल्या शरीराला नियंत्रित करते. वलयाला काही झाले तरी केंद्राला विशेष फरक पडत नाहीपण केंद्राला काही झाले तरी संपूर्ण वलय प्रभावित होते. अगदी अशाच प्रकारे गर्भवतीचे सकारात्मक विचार हे गर्भावर प्रभाव टाकीत असतात. जर गर्भवती आनंदित असेल तर गर्भात विकसित होणारे बाळ सुद्धा शांत व आनंदित होते. ज्या प्रमाणे गर्भात बाळाचा शारीरिक विकास होत असतो, त्याच प्रकारे त्याचा भावनीक व मानसिक विकास  पण याच अनुभव आपल्याला बाळ जन्मल्यावरच लक्षात येतो. तो अशा प्रकारे कि काही बाळ शांत व आनंदित असतात. तर काही एकदम किरकिरी व रडकी असतात. या मागील कारण असे कि ज्यावेळी गर्भवती आनंदी व सामाधानी असते. त्यावेळी तिच्या शरीरात काही  ‘आनंदी हार्मोन्स’  तयार होतात.  आणि हे हार्मोन्स रासायनिकरित्या मन शांत करण्यासाठी देणाऱ्या औषधांसारखेच असतात. गर्भात बाळ वाढत असताना गर्भ संस्कारांमध्ये गर्भवतीला ‘क्रिएटिव्ह व्हिजुअलायझेशन शिकविले जाते. या मानसिक व्यायामाने गर्भवतीचे सबकॉन्शिअस विचारांचा प्रोग्राम करता येतो. व यामुळे सकारात्मक विचार निर्माण होऊन बाळावर, त्याच्या मेंदूवर  व शारिक विकासावर पॉझिटिव्ह परिणाम दिसतो व या मुळे शरीरामध्ये रक्त पुरवठा छान होतो. त्यामुळे निरोगी पेशी निर्माण होतात.

नकारात्मक विचार व बाळावर होणारा परिणाम.

गर्भवतीचे नकारात्मक विचार हे भीतीदायक दडपणाला उत्तेजना देतात. याचा परिणाम ती उत्तेजना गर्भातील बाळाच्या संप्रेरक संबंधीत संस्थेला उत्तेजित करते त्याचा परिणाम बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो. त्या ब्द्द्ल्क्चे प्रयोग ज्यावेळी झाले त्यावेळी सिद्ध झाले की ज्या गर्भवती त्याच्या त्यांच्या गर्भावस्थेत जबरदस्त द्डपनाखाली असतात, त्यांना होणाऱ्या बाळांना त्यांच्या आयुष्यात स्वभावातील संबंधीत बर्याच समस्या निर्माण होतात. तसेच त्यांना होणारे बाळ हे वेळेच्या आधीच म्हणजे ‘प्रिम्यच्यूअर’ सामान्य वजनापेक्षा कमी वजनाचे, अति चंचल, चिडचिडे, सतत रडणारे अशा प्रकारचे होते. सेलबायोलॉजिस्ट न न्युरोसायंटिस्ट  बूस लिप्टन लिहितात की दडपणाखाली असलेल्या गर्भवती किंवा ज्या गर्भवती गर्भावस्थेत बर्याच काळापासून दडपणाचा अनुभव करतात. तेव्हा तिच्या शरीरात तयार होणारे स्ट्रेस हार्मोन्स हे तिच्या रक्तप्रवाहां मार्फत गर्भातील बाळापर्यंत पोचतात व ते गर्भातील बाळाच्या रक्त प्रवाहात व त्याचे वितरणावर परिणाम करतात आणि विकसित होणाऱ्या बाळाच्या गुणतत्वांना बदलवून टाकतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu