कैलाश दोन आहेत, एक महाकैलाश आणि दुसरे म्हणजे भू-कैलाश, वर्तमानात शिव भक्तगण किंवा आपण सामान्य जन ज्याला कैलाश मानतो, तो म्हणजे असली भू-कैलाश नाही. भू-कैलाशावर फक्त शिवगण शिवाय अन्य कोणीही जाऊ शकत नाही. काशी – केदार महात्म या ग्रंथात चतुर्थ अध्यायात महांकैलाशां चे वर्णन सांगितले आहे. अनंत कोटी ब्रम्हांडाचे आधारभूत ‘महोद्क’ लाख योजना अशी विस्तीर्ण स्वर्ण-भूमी आहे. तेथे लाख योजन उंचावर परमेश्वराचे स्थान आहे. त्यालाच वेद्वित पुरुष ‘महाकैलाश’ म्हटलेले आहे. त्याच्या चारी बाजूने पंन्नास हजार योजन विस्तीर्ण व वीस हजार योजन उंचाई वर चांदीने बनविलेल्या भूमीचा घेरा आहे. त्याच्या आठ दिशांनी मनिमोतीयांचे बुलंद दरवाजे बनलेले आहेत.पूर्व दिशेच्या दरवाज्याचे मालक महात्मा ‘विघ्नेश’ आहे. आग्नेय दिशाच्या दरवाजाचे मालक ‘भृंगरिटी’ आहे. दक्षिण द्वारात गणांचे सरदार ‘महाकाल’ आहे. नैऋत्य दिशेच्या दरवाजाचे द्वारपाल साक्षात शंकराच्या अंगातून उत्पन्न होणारे ‘वीरभद्र’ आहेत. पश्चिम दिशेच्या दरवाजाचे मालक शिवदुहिता ‘महाशास्ता’ आहे. वायव्यकोनात द्वारपालीका संकटमोचिनि ‘दुर्गा’ आहे. उत्तर दिशाचे द्वारपाल सुब्रहंण्य नावाचा’ पर-शिव’ आहे. तसेच ईशान्य दिशाला द्वाररक्षक ‘शैलादी गणनायक’ आहे. यांचे जे सहकारी आहेत त्यांची तर गणती अनंत आहे. पंन्नास हजार योजन विस्तारित ती नगरी त्यात वीस हजार योजन उंच उंच शंभर अरब शिखर आहेत. ते सर्व बाजूंनी मुंगा ने घेरलेले आहेत. त्यांच्याही आंत दहा हजार योजन उंच उंच दहा अरब श्रुंग शिखर आहेत ते सर्व पद्मराग मनिंचे बनलेले असून चारही बाजूने उभे आहेत. त्यांच्या आंत तीस हजार योजन उंच असे एक करोड वैडूर्यमय़ शिखर आहेत ते चारही बाजूने घेरले आहेत. बुलंद दरवाज्याच्या बाहेरील भूमी दहा हजार योजन विस्तीर्ण आहे, दरवाज्यांच्या आतील भूमी चाळीस हजार योजन परीमाणीत आहे. त्या भूमीत फक्त सालोक्यमुक्ति मिळालेले गण राहतात. तेथे त्यांच्या मनोनुकूल घर, बाग-बगीचे, बाहुली-विहिरी, नहर -नद्या, सुंदर- नंदनवने आहेत. ती भोग भूमी दिव्य अप्सरा, दिव्य खानपान, दिव्य भोगांनी परिपूर्ण आहे. तेथे अगणित शिवाचे गण आणि सुंदर प्रभावशाली रुद्र कन्या राहतात. तेथे कल्प वृक्षाचे वन आणि कामधेनूचे कळप आणि चिंतामणीचे असंख्य ढेर आहेत. तेथे महा पुण्यवान असे शिव- धर्मपरायण, शिवाचे आराधक,आणि शिव भक्तांना पूजनेवाले जे सालोक्य मुक्ती प्राप्त झालेले लोक असतात. तेथे ज्यास ज्या वस्तूची ईच्छा प्रगट केली ती एकदम समोर येते. तेथील लोक सारुप्य, सामिप्य आणि सार्ष्टी मुक्ती प्राप्त करू शकतात.
तेथील शिखरांच्या आतं सर्व दिशांना प्रकाशित करण्यास चाळीस हजार योजन उंच उंच पुष्पराग मनींचे श्रुंग आहेत. त्यात शिव-पूजक गंधर्व, यक्ष, किन्नर, गरुड, नाग हे सर्व भोग युक्त होऊन राहतात. त्याच्या आतील शिखरांत पन्नास हजार योजन उंच उंच एक करोड गोमेदंक मनीने श्रुंगारलेले घेरे आहेत. त्यांत सर्व इंद्र गण शंकराची आराधना करीत असतात. तसेच साठ हजार योजन उंच उंच दहा लाख नीलमणीचे घेर असलेले शिखर आहेत त्यांत चार मुखवाले असंख्य ब्रम्हा ज्यांचे हृद्य आणि मन शिवज्ञानाने शांत झालेले असे शिव घ्यानात रत झालेले बसलेले आहेत. त्यानंतर एक लाख एक नीलम मनीं चे चमकणारे श्रुंग आहेत त्यांत अनेक विष्णुरूप निरंतर शिवाचे ध्यान करीत असतात. त्यांचा अधिकार समाप्त करून शिवाच्या ध्यानाने परम मुक्तीची ईच्छा ठेऊन हृदयातील समस्त मल दूर करून सत्तर हजार योजन उंच उंच शिखरांत लोक राहतात. यांना शेवटी तारतम्य साउज्य मुक्ती प्राप्त होते. त्यानंतर अंशी हजार योजन उंच उंच दहा हजारांचे मुक्तमनींचा घेरा असलेले श्रुंग त्यात महात्मा रुद्र गण गुरूसेवां च्या महात्म द्वारे सारुप्य मुक्ती प्राप्त करून हृदयात शिवाचे ध्यान धरून बसलेले आहेत. लोकांवर अनुग्रह करणारे हे महात्मा नित्य मुक्त असतात. आणि शिवाच्या आज्ञे नुसार कैलाश मध्ये आपल्या तेजाने दैदिप्त्यमान होऊन निवास करीत असतात. तद्नंतर त्यांच्या आंत नव्वद हजार योजन उंच उंच एक हजार एक दिव्य स्पटिकांचा घेरा असलेले शिखर त्यांत नंदी, भृंगी, महाकाल, वीरभद्र हे प्रत्यक्ष परमात्मा शिवाचीच मूर्ती आहेत. सतचितानंदस्वरूप, सायुज्य तथा मुक्ती प्राप्त करतात. हे शिवजीच्या आज्ञे नुसार करोडो ब्रम्हांड बनवतात व बिघडवतात तसेच सर्व विध्वंश, सर्वनाश देखील करण्यात समर्थ असतात. हे आपल्या इच्छेने महा कैलाश चे रक्षण करतात. त्यांतही आंत एकशे एक योजन उंच उंच हिऱ्याचे एकशे एक शिखर आहेत ते संपूर्ण धाम प्रकाशमय करतात. हे सर्व धामाला घेरून रक्षण करतात.
श्री शिव प्रभू- देवी शक्ती विराजित आहेत. स्वामी कार्तिकेय, विघ्नराज श्रीगणेश या अंत:पुरात नित्यानंद धामात प्रभू महेश्वर आणि जगदंबा यांच्या सेवेत लागलेले असतात. हा ज्योतिर्मय धाम लाख योजन उंच असून येथे साधारण देवतांसाठी अगम्य आहे. त्यालाच अंत-पुरी धाम म्हटलेले आहे. त्यानंतर शिवशंभू नीज धाम संपूर्ण ज्योतिर्मय अकरा श्रुंगांनी घेरलेले आहे. तेथे शिव प्रभू अनुग्रहात्मक आहेत. शांतस्वरूप आपल्याच महिमेत प्रतिष्ठीत आहेत. अलौकिक अशा विशाल सिंहासनावर पराभक्तीसहित विराजित असतात. बाहेरील दहा घेरांतील निवासी सदा त्यांच्या ध्यानांत व सेवेत असतात. आणि शिवप्रभूच्या आज्ञे नुसार अंत:मुक्ती प्राप्त करतात. ‘महाकैलाश’ प्रमाणे भू कैलाशमध्ये त्यांनी त्याच प्रमाणे कल्पना केलेली आहे. भू- कैलाश शिव गणांसहित प्रलयकाल मध्ये उंच उठून अन्डचा भंग करून संपूर्ण परिवारा सहित बाहेर निघूनत्या नित्य अलौकिक महा कैलाशच्या अंतर्भूत सामावून जातो. निग्रह आणि अनुग्रह नुसार सदाशिवाच्या मूर्तीत अंतर असतो. जंबू -दीप कैलाश आणि महा कैलाश यांच्या भूमिका प्रभू परमेश्वरा च्या निग्रहानुग्रहचे शाश्वत ठिकाण आहेत.
Lord Shiva is believed to be living in Kailasa, a peak in the Great Himalayas. Lord Shiva is also called as Nilkanth. Anyone who gets ‘self realization’ achieves the internal state of ‘Shiva’. This page provides information about Lord Shiva. Lord Shiva is a Hindu deity and represents the aspect of the Supreme Being. Satya – Shiv – Sundar.