श्री शिव प्रभूची अष्टमूर्ती




Nilkanth-Lord-Shiv-wide

‘प्रभू’ हा एकच आहेत, सृष्टी, स्थिती आणि प्रलय यांचे कर्ता करविता ब्रम्हा, विष्णू, महेश हे तीन विभिन्न नावे आहेत. तेच शांत, शिव, अद्वैत आणि चतुर्थ आहेत. तेच विश्वाद्य, विश्वबीज, विश्वदेव, विश्वरूप, विश्वाधिक, विश्वांर्तयामी आहेत. ‘सर्व खल्विदं ब्रम्ह’ सर्व ब्रम्हमय आहे.  जो सर्व भूतांत स्थित आहे, सर्व भूतांचे पृथक आहे, सर्व भूत त्यांना जाणत नाहीत परंतु सर्व प्रकृती त्यांचेच शरीर आहें तेच शरीरांत राहून नियंत्रण करीत आहेत. तेच आत्मा तेच अंतर्यामी आणि तेच अमृत आहेत. शिव पुराणांत ‘श्रीमहादेव’ म्हणतात मी शिव हे शिव, तू शिव सर्व शिवमय आहे. “शव + ईश्वर = शिव , शिव – ईश्वर = शव .  शिवाच्या अतिरिक्त काहीच नाही.”

पंचभूतांत जग संघटीत आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, चंद्र, सूर्य आणि जीव या सर्वांचा बोध म्हणजेच शिवाचे एक नाव  ‘अष्टमूर्ती’ होय.  या देवाधिदेवात ‘अष्टमूर्ती’ अशी व्याप्त आहे जसे सुतांत सुताचेच मणी, या अष्टमूर्तिं ची नावे – शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, महादेव आणि ईशान आणि ‘अष्टमूर्ती’ म्हणजे क्रमश: पृथिवी, जल, अग्नी, वायू, आकाश, क्षेत्रज्ञ, सूर्य आणि चंद्र  यांना अधिष्ठित केलेले आहे. तेव्हा या अष्टमूर्तिं सहित परमकारी शिवाची भक्ती केली पाहिजे.

*  ओम  शर्वाय क्षितीमूर्तये नम: |
*  ओम  भवाय जलमूर्तये नम : |
*  ओम  रुद्राय अग्निमूर्तये नम : |
*  ओम  उग्राय  वायूमूर्तये नम : |
*  ओम  भीमाय आकाशमूर्तये नम: |
*  ओम  पशुपतये यजमानमूर्तये नम : |
*  ओम  महादेवाय सोममूर्तये नम: ।
*  ओम  ईशानाय सूर्यमूर्तये नम: |

सूर्य, चंद्र हे प्रत्यक्ष देवता आहेत.  पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश हि पंचभूत होत. जीव क्षेत्रज्ञ होय. जीव म्ह्णजे यजमान (पाहुणा थोड्या काळाचा) तो उपासना करण्या करीता आला आहे. पाश-माया (मोहपाश) युक्त जीव म्हणजे पशु याचा उद्धारकर्ता ‘पशुपती’ म्हणजेच देवाधिदेव “महादेव”  तेच जिवाचे पापमोचन करतात.

Above given Such eight attributes create the Shiva aspect of Astamurti. with this attributes bhagwan shiv is called as Ashtamurti.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड