‘स्त्रीत्व’ जपण्याचा संघर्ष




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Conflict to protect Femininity Day by day world losing Femininity and we must need to take serious steps to save our Femininity. this article is based upon the Femininity .

stritwa japnyach prayatnस्त्रीत्व म्हणजे नाजूकता, लवचिकता, सुकुमारता, सहनशीलता याच गुणांचा समतोल आणि उत्कर्ष जितका चांगला, तितका शरीर आणि मनाला त्याचा रचनात्मक आणि क्रियात्मक अधिकाधिक लाभ होताना दिसतो. लवचिकता उत्तम असल्यामुळे जीम्नास्टिक या क्रीडा प्रकारात स्त्रियांच सारीक्र्ण जितक सफाईदार असतं, तितकं पुरूषांच दिसत नाही. सहनशीलता असल्याचे कितीतरी उदा. आपण बघितलेली आहेतं उदा, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई किती ती हिम्मत, दोन मुलांची आई असताना मेरी कोमनं ऑंलिंपिकच्या कास्य पदकाला गवसणी घातली. मार्शल आर्ट मध्येही स्नायुंच्या लवचिकतेचा सफाईदार उपयोग केलेला आढळतो. स्त्रियांनी स्वसंरक्षणासाठी हि कला शिकायची ठरवल्यास त्या ती खूप आत्मसात करू शकतात. सहनशिलता लवचीकता उत्तम असल्यान कथ्थक नृत्यांगना वयाच्या साठी नंतरही शा ते आठ तास नृत्य करताना आपण प्रत्यक्ष बघतोच. या सर्व गुणांच्या मागे असतं ते शरीरातील सप्तधातूंच रचनात्मक आणि क्रियात्मक संतुलन. पाणी रक्त, मास, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या सप्त धातुंमुळे हे सर्व टिकून असतं. दैनंदिन आयुष्य जगताना साधेसोपे निसर्ग नियम पाळल्यास हे संतुलन टिकण्यास मदत होते. ‘लवकर झोपणे आणि लवकर उठणे’ हा नियम शरीराच्या आणि मनाच्या विश्रांतीसाठी आवश्यक असतो. नियमित वेळे वर, जेवण, काम, विश्रांती, व्यायाम यां नियमाने आपल्या शरीरातील जठराग्नी ची क्षमता सु व्यवस्थित करतात. सध्याची जीवनशैली पाहिली तयर कोलेज मध्ये जाणार्या मुली, नोकरी करणाऱ्या महिला टी.व्हि, मोबाईल कंप्युटर या मुले उशीरा पर्यंत जागतात सकाळी लवकर उठत नाही त्यामुळे व्यायामाला वेळ नाही, रात्री जाग्रनाणे शरीरातील कोरडेपणा वाढतो.नाजूकता आणि सुकुमारता कमी होते. व व्यायाम न केल्यामुळे शरीराची लवचिकता कमी होते. शरीर बोजड बनतं, व कधीकधी लठ्ठपणा वाढतो. त्यानंतर सतत कंटाला किंवा आळस येतो. खाण्यात मसालेदार, चमचमीत पदार्थांचा सामावेश असल्यान पितं वारंवार वाढतं, जठराग्नी बिघडतो, अस्वस्थ वाटतं त्यामुळे सहनशीलता नष्ट होते. चिडचिड वाढते अशावेळी, स्त्रीत्व जपण्यास फार संघर्ष करावा लागतो. म्हणून आयुष्याच सम्यक ज्ञान करून देणारा आयुर्वेद आपल्या मदतीला येतो. धातूंच संतुलन आणि रसायन चिकित्सा आपलं स्त्रीत्व अबाधित राखायला मदत करीत असतं .

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा