ज्यां आजारांवर घरच्या घरी उपाय करून बघता येईल त्यात सर्व प्रथम विचार करावा तो अग्निमाद्याचा! पावसाळा सुरु झाला की बरं वाटत नाही. उत्साह वाटत नाही, भूक लागत नाही. या तक्रारींच मूळ कारण असत अग्निमाद्य. अग्निमाद्य म्हणजे खाल्लेल अन्न शरीराला पोषक होत नाही. शरीराने घेतलेल्या आहाराच रस, रक्त, मांस या धातूत रुपांतर होत नाही. आणि एकूणच सर्व शरीराची ली बदलते. याच बाह्यरूप म्हणजे खाल्लेलं पचत नाही आणि भूक लागत नाही.
शहरी दगदगी च्या जीवनात, किंवा दमट वातावरणात बुद्धीजीवी वर्गात हे प्रमाण जास्त आढळते. मनावर सतत पडणारा ताण हे ही अग्निमाद्या चे कारण असू शकते. आहारसंबंधात ‘प्रज्ञांपराध’ म्हणजे कळतं पण वळत नाही. चुकिचा आहार व चुकीची औषधे घेण्यानेही अग्नीमाद्य होते. उपचाराच्या दृष्टीने अग्निमाद्यात तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे.
पहिला प्रकार मंदाग्नि, यात जेवण घेतल किंवा कमी जरी घेतल तरीही पचत नाही. उलटी सारखं वाटतं, अंग गळून पडतं, डोकं व पोट जड वाटतं. म्हणजेच निरुत्साही. यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे लंघन. आधी खाल्लेलं पचून खरी भूक लागे पर्यंत लंघन करावं. आणि गरम पाणी पीत राहावं. गरम म्हणजे गरमच (उकळून थंड केलेलं नाही ) नंतर पोट हलक वाटू लागलं भूक लागली, सुद्ध ढेकर येऊ लागली,तरच हलका आहार घ्यायला सुरवात करावी. मंदाग्नीच्या लोकांनी आठवड्यातून, पंधरवडयातुन, अस लंघन व संसर्जन करावच. चमचमीत व भरपेट खाऊ नये. याव्यक्तिंनी जेवणावर पाणी पिऊ नये. या वर घरगुती उपाय म्हणजे सुंठ, मिरी, पिंपळी, हिंग यांची पूड करून त्यात चवीला सैंधव व सौवर्चल घालून घेणे. सुंठ, पिंपळी नसली तर सुंठी एवजी आल्याच्या रसात हिंग, मिरी , मीठ घातले तरी चालेल. सामुद्र द्रव चूर्ण या तयार औषधांमध्ये याव्यतिरिक्त चित्रक व ईतर अग्निदीपक क्षारही असतात. तेही घेतल्यास हरकत नाही. शंखवटीचाही उपयोग होतो, मात्र याचुर्ण सोबत गरम पाणीच घ्यावे.
दुसरा प्रकार म्हणजे तिक्ष्माग्निचा, यात भूक चांगली लागते. पण खाल्लेलं अंगींमांसी लागत नाही. अश्यावेळी खूप खायला देण्यात किंवा पोषक खायला देण्यात काही अर्थ नाही. किंबहुना अग्नीच-पचनाच कार्य अधिकाधिक बिघडण्याचा संभव असतो. बऱ्याचवेळा यकृताची कार्यशक्ती बिघडल्याने असे होत असते. यासाठी तज्ञांकडून चिकित्सा करून घ्यावी.
तिसरा प्रकार- विषमाग्नीचा हा प्रकार खरोखरीच विषम. या व्यक्ती कधी कधी खाल्लेलं छान पचवतात. कधी कधी थोडं खाल्लं तरी पचत नाही. पोट वारंवार फुगत, पोटात गुडगुड्त, पोट डब्ब वाटतं , अस साधारण वर्णन आहे, याव्यक्तींनी लंघन तर करावचं आणि लंघन करताला पाण्यात लिंबू रस सैंधव व हिंग घालावा. ग्लासभर पाण्यात एक लिंबाचा रस, १/२ चमचा सैंधव पूड व पाव चमचा हिंग घालावा. व ते मधून मधून प्यावे. या प्रकारच्या पचनाच्या तक्रारी साठी शंखवटी चालते. तसेच जेवण झाल्यावर पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण एक चमचा गरम तुपातून घेतलं तर काहींना चांगलच लागू पडतं. पण यांनीही जेवणात पाणी पिऊ नये.
अग्निमाद्याचि तक्रार असल्यास शिळ, थंड अन्न अजिबात घेऊ नये, तसेच तेलकट, तुपट पदार्थ, कोल्ड्रिंग, फ्रीजचे पाणी, या अजिबात टाळाव्यात, आलं, लसून, पदिना, कढीपत्ता, लिंबू हे मसाले दोडका, शेवगा, सुरण, कारले, पडवळ, दुधी या भाज्या पथ्यकारक आहेत. फुलके, भाकरी, जुन्या तांदळाचा भात हेही पथ्य आहे. आणि घरघुती औषधांसारख्या न वाटणार्या गोष्टी म्हणजे डाळिंब आणि काळ्या मनुका बाजारात यांचे कल्प मिळतात. त्यात ईतरही औषधे द्रव्य असतात. पण प्रतिबंधक उपायासाठी फक्त एकेरी औषधांचा चांगला उपयोग होतो. अग्निमाद्यात सर्वात महत्वाचा घरघुती उपाय म्हणजे एक वेळचे जेवण रात्री जेवण घेऊ नये. अन घ्यायचं झाले तर अति हलके. कारण अजीर्ण होतं आणि अतिसारही होऊ शकतो. साधारण मोठ्या आतड्यांच कार्य बिघडून ग्रहणी, आवं, कोलायटीस ‘इरिटेबल बॉवेल’ असे रोग होऊ शकतात. म्हणून अशी खबरदारी घ्यावीच. हे सर्व जमलं तर पोटाच्या तक्रारी नक्कीच राहणार नाही.
Note: Home remedies offer you herbal and natural method to treat acidity effectively. We’ve all suffered from it at some point or the other. We share tips to cure acidity ..