Palak Recipes :
Palak paneer, spinach paneer, sadabahar palak paneer recipes., Another hot favorite maharashtra dish! This mildly flavored dish is super healthy too. If you like Paneer and spinach then must cook palak paneer.
साहित्य : अर्धा किलो पालक, १०० ग्रम पनीर, एक मोठा कांदा, दोन टमाटर पेस्ट, अर्धा इंच आले, पाच पाकळ्या लसून, सात, आठ हिरव्या मिरच्या यांची पेष्ट एकत्रित करून, मीठ, पाव कप ताजे क्रीम किंवा दुधावरची साय, फोडणी करीता दोन चमचे साजूक तूप, किंचित हिंग व हळद.
कृती :- पालक निवडून व स्व्च्छ करून घ्यावी. थोडे पाणी गरम करण्यास ठेवावे पाणी उकळले कि त्या गरम पाण्यात पालक पाने ठाकावीत पातेले झाकून ठेवावेत ग्यस बंद करून घ्यावा. पाच मिनिटाने चाळणीवर टाकून पाणी काढून टाकावे व पालक पानांची पेष्ट करून घ्यावी. ग्यसवर कढई ठेवून गरम झाल्यावर त्यात तूप घालावे. जिरे, हिंग, हळद याची फोडणी करावी. शिजल्या नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, आले,लसून हिरवी मिरचीची पेस्ट टाकावी छान गुलाबीसर शिजू द्यावे. टमाटर पेस्ट टाकावी. चांगले तेल सुटे पर्यंत परतावे किंचित तिखट, चवीनुसार मीठ, पालक पेस्ट घालावी संपूर्ण भाजी थोडावेळ शिजू द्यावी, उतरविण्या पूर्वी त्यात पनीरचे बेताच्या आकाराचे तुकडे घालून परत थोडावेळ भाजी शिजू द्यावी. भाजी गरम असताना त्यात क्रीम अथवा साय घालून जेवणात वाढावे. आणि जर तळलेले पनीर आवडत असेल तर पनीरचे तुकडे थोडे तळून घ्यावे नंतर भाजीत घालावे.
पालक पनीर प्रकार २.
साहित्य :- अर्धा किलो पालक, १०० ग्रम किसलेले पनीर, तीन हिरव्या मिरच्या, एक छोटा चमच जिरे, सात पाकळ्या लसून, चवीनुसार मीठ, हिंग,तेल.
कृती -: पालक स्व्च्छ करून त्याची मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी. हिरवी मिरची,जिरे,लसून एकदम बारीक वाटून घ्यावे. पाल्कच्या पेस्ट मध्ये मीठ, मिरची जिरे,लसणाची पेस्ट पनीर घालून भाजी कढईत मंद अग्नीवर शिजवावी, शिजल्या नंतर तुपात जिरे व हिंग घालून फोडणी करून त्यात घालावी, या भाजीत तिखट,हळद घालू नये. त्यामुळे तिचा हिरवा रंग चांगला दिसतो.
पाकल भजी.
साहित्य -: जेवढी भजी करावयाची असेल तेवढीच बेताची पालक पाने, बेसन एक चमचा आलं लसून पेस्ट, चवी नुसार तिखट, मीठ, एक चमचा ओवा, तळणासाठी तेल.
कृती-: पाने स्व्च्छ करावी त्याचे देठ ठेवावे, धुवून चाळणीवर निथळत ठेवावे. नेहमी प्रमाणे भज्याचे बेसन भिजवीतात त्याच प्रमाणे बेसन भिजवावे. कढईत तेल गरम करायला ठेवावे, गरम झाले कि एक पान घेऊन बेसनात बुडवून त्याची घडी पाडल्या प्रमाणे करून गरम तेलातून गुलाबीसर (कडक) भजी बनवावी. दह्याच्या चटणी सोबत ही भजी फारच छान लागतात.