Humanity, Talent and success are three pillars of the human, with this three pillas we can achieve any thing in this world.
मनुष्याचे सत्यशील चारित्र हेच लोकांच्या विश्वासा योग्य बनविते. कुणीही आपल्याला म्हटले पाहिजे कि ‘आम्हाला आपला विश्वास आहे. ‘मनुष्याने जे बोललं तेच केल पाहिजे.तेव्हाच आपले भाव हि तसेच दर्शवितात. आपले भाव, विचार, वाणी आणि क्रिया यांच्यात एकरूपता असायला हवी. तेव्हाच ईतर सूक्ष्म नजरेतून आपल्याला पारखतील, समजतील.काही लोक मनुष्याच्या वरच्या सौंदर्यावरुनच अनुमान लावतात. ते शेवटी फसतात. आजच्या युवा पिढीला आपल्या चारीत्र्याचे भानच नसते. ते त्याना शालेय जीवनातच मिळायला हवे. कारण आजची युवा पिढी आपल्या चारित्र्याची दौलत रस्त्यातच लुटताना दिसतात. फिल्मी कलाकारांचे अनुकरण, त्यांचेच रंग-ढंग , चमक-दमक बघून दिखावटी भ्रमात स्वत:ची फसगत करीत आहेत. पण ते हे जाणून घेत नाही की कलाकारांचा तोच व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायात आपली फसवणूक होत आहे. आपण वाईट मार्गावरून जात आहोत. त्यांचे अनुकरण करण्याची काही एक गरज नाही. ते फक्त पडद्यावर दिसण्यासाठीच चमक-दमक दाखवितात. ते सर्व काही नकली आहे. सुंदर दिसणारा धोका आहे. त्यांचेही जीवन साधारणच असते. ते त्यांचे मिळकतीचे मार्ग आहेत. पण हे अविचारी व नासमझ लोक त्या नादी लागून आपले आयुष्य व पैसा बरबाद करण्याच्या मागे लागले आहे. तेव्हा येणार्या पिढीला सावध करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे चारित्र्य सुंदर व मजबूत करणे अत्यावश्यक आहे.
येणारी पिढी देशाचे भविष्य आहे, संपूर्ण चारित्र्य हे आपल्यातच आहे फक्त त्याला मार्गदर्शन करून जागे करावयाचे आहे. प्रत्येक जिवांत तो ईश्वर रूपाने आहे, त्याला वेगवेगळ्या जाती, धर्मात वेगवेगळे नाव दिल्या गेले आहे. त्याच्या साहाय्यानेच मनुष्याला आपल्या जीवनाच्या सर्वोच्च शिखरावर पोह्चावयाचे आहे. स्वत:ला पूर्णतेने संतुष्ट करावयाचे आहे व आपल्या आसपास तीच चारित्र्याची सुगंधता पसरवून आपला एक आदर्श प्रस्थापित करायचा आहे. तोच व्यक्ती हि कार्यक्षमता ठेवून संपूर्ण समाजाला स्वस्त, विकाररहित करून सफलतेच्या शिखरावर नेवू शकतो.
Humanity, Talent and success are three pillars of the human, with this three pillars we can achieve any thing in this world.