स्वस्थवृत्त समजून घ्या!
Like
Like Love Haha Wow Sad Angry

health guide from expertsसर्व साधारणपणे प्रचलित असलेला एक गैरसमज म्हणजे शास्त्र जेवढ क्लिष्ट तेवढच अधिक कस असलेलं आणि एखादी गोष्ट करायला सोपी समजायला सुलभ असली तर ती निकृष्टच असली पाहिजे ! तसं मुळीचं नसतं सोप्या सुलभ पद्धतीने जनमाणसांच्या  पचनी एखाद शास्त्र उतरवणं यात ती बाब सोपी,उथळ असते अस नाही. त्यातील शास्त्र हि सखोल असू शकतं. पण ते विलक्षण हातोटीने सर्वांना समजेल,सर्वांना आचरणात आणता येईल अश्या पद्धतीन सांगितलेलं असतं. आयुर्वेदातील दिनचर्या आणि ऋतुचर्या हे याच उत्कृष्ठ उदाहरण आहे. सृष्टीचे व्यवहार, अन्न पदार्थ शरीर क्रिया यांचे परस्पर संबंध अतिशय मुलभूत पातळीवर अभ्यासून त्यांचे निष्कर्ष नि:संदिग्धपणे पण ढोबळमानाने जनमानसांच्या आरोग्यासाठी मांडणे यासाठी अभ्यासकाची सारी बुद्धी साधना, व कौशल्य पणाला लागलं असणार !

यातून ठळकपणे मांडलेला विचार म्हणजे सृष्टीमहाभौतिक आणि शारीरही पंचमहाभौतिक.दिसायला प्रत्येक पदार्थ स्थिर वाटत असला तरी सुक्ष्मत्वाने तो भाव अस्थिर असतो. सृष्टीत स्वस्थता नाही म्हणून शरीरात स्थिरता नाही.बदलत्या ऋतुंमुळे सृष्टीतील पंचमहाभूतांच प्रमाण जसजस बदलत जातं,तसतस शरीराती त्या त्या पंचमहाभूतांचे गुण वाढत जातात. किंबहुना सूर्य उगवून मावळे पर्यंतही असेच सूक्ष्म बदल होत असतात. याच्या देहावर होणाऱ्या परिणामांचा वेध घेऊन आरोग्य रक्षणासाठीच मार्गदर्शन केले जाते. दैनंदिनी व्यवहारात आरोग्याला अनुकूल होतील अश्या तर्हेने कसे करावेत यांचच शास्त्र म्हणजे दिनचर्या. दिनचर्येत प्रत्येक मनुष्यान रोज कसं वागावं,आपल शरीर निरोगी राहण्याकरीता सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत काय काय करावं तेच सांगितल्या जातं. (आजच्या या धकाधकीच्या काळात बाल-युवा वगळले तरी वयो-वृद्धांनी तरी आपापली दिनचर्या ठरवूनच वागायला हवे. कारण याच कालावधीत मनुष्याला आरोग्याविषयी अति दक्ष असायला हवे.)

साधारणत: सर्वांनी सकाळी उठणे,शरीराच्या आरोग्याचा आढावा घेणं, शौच-मुखमार्जन,दंतघावन करणं,डोळ्यात अंजन घालणं,नस्य करणं (नाकात औषधी तेलाचे थेंब घालणं) कर्णपूरण करणं (कानात औषधी तेल घालण ) व्यायाम करणं, मर्दन,अभ्यंग,अंगमार्जन (अंग पुसणं ) वस्त्रधारण (ऋतुमानानुसार ) उपासना,उपजीविका,भोजन,झोप आणि स्त्री-पुरुष संबंध असे नित्यक्रम (किंवा नैमित्तिक ) जे आपल्या दिनक्रमात येतात, त्या विषयीच सांगितल्या जात.
मात्र आजच समाज जीवन ईतक बदललेलं आहेक़िया सल्ल्याचे पालन करणे व्यवहारिक ठरणार नाही. तरी देखील
शास्त्रात दिनश्चर्येतील दोन गोष्टी आजही महत्वाच्या आहेतत्या म्हणजे सकाळ उठल्यावर ‘शरीर चिंता ‘करणं आपल्या शरीराचा आढावा घेणं आणि दुसरे म्हणजे भोजनादिकांचे नियम पाळण. आहारविषयक सल्ला देताना दिनचर्येत प्रामुख्याने विचार करावाच लागतो तो म्हणजे नैसर्गिक परिवर्तनाच्या दोषांवरील परिवर्तनाचा.दोष हे शारीरिक व्य्पारामचे शाषक असल्याने दश समक्ष असले तरच शरीराचा कारभार सुरळीत चालतो. म्हणून दिवसभरात निसर्गात आणि शरीरात काय घडामोडी घडतात ते बघणे आवश्यक.

 शारीरिक घडामोडी.

सकाळच्या थंड वेळात शारीरिक ‘कफ’दोष बलवान असतो. म्हणूनच सकाळच्या वेळी कफकारक आहार घेऊ नये अथवा विहार करू नये, गोड, स्निग्ध,थंड असा आहार कफकारक आहे. विशेषत: कफ प्रकृतीच्या व्यक्तीने याची दखल घेतली पाहिजे. सकाळी खाण तालाव्च. कफ वाढू नये यासाठी सकाळी व्ययाम केलेला उत्तम मात्र तो किती करावा हेही प्रकृती नुसार ठरवावं. वात व्यक्तींनी बेताचा व पित्ताच्या व्यक्तीने मध्यम व्यायाम करावा. आणि कफ प्रकृती व्यक्तींनी मात्र भरपूर व्यायाम आवश्यक असतो.

दुपारच्या वेळी पित्ताचा जोर वाढू लागतो. अशावेळी आहार करून पित्ताचे शमन करावं ते वाढू देऊ नये. आणि सायंकाळी वात दोष स्वाभाविकपणे वाढत असतो. अशावेळी वातदोष वाढविनाऱ्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या असाच बदल रात्रीही घडून येतो.  पूर्व रात्री शरीरातील कपदोष वाढतो.मध्यरात्री पित्तदोष आणि पहाटेला वातदोष वाढतो. तेव्हा हे बदल लक्षात घेऊन आपापल्या प्रकृतीनुसार पत्थ पाळायला हवे.  कफ,पित्त,वात बिघडण्याच्या या प्रक्रिया याच क्रमाने चालू असतात. याचाच अर्थ वाढणं,पचण,आणि मोडकळीला येणं हा सर्वच क्रियांचा क्रम असतो. अन्न घेतलं कि प्रथम कफ वाढतो. नंतर पित्त व शेवटी वात ! म्हणूनच जेवण झाल्यावर लगेच झोपू नये.  कारण कफ वाढतो आणि कफाचे रोगही होऊ शकतात. बाल वयात कफाच प्राधान्य असत आणि शरीराची वाढही होत राहातें मध्यम वयात पित्त प्रबल असतं. वाढ थांबते आणि परिपक्वता येते. आणि वार्धक्यात वाताच आधिक्य त्यानंतर देहाची झीज होत राहाते. वरवर पाहता हे तथ्यहीन वाटल तरी याला वैज्ञांनिक बैठक आहे. आधुनिक शास्त्र याला ‘क्रोनोबॉयोलॉजी ‘ म्हणत. ज्या प्रमाणे दिनमान बदलतं त्या नुसार शरीरातील प्रक्रिया बदलतात. रक्तदाब अष्टौप्रहर तोच राहात नाही. नाअदिचा वेग दिवसारात्री वेगवेगळा असतो. एवढच नव्हे तर अंर्तस्त्रावी द्रव्य एका ठराविक नियमाने शरीरात स्रवतात म्हणजे  उजाडताना त्यांची पातळी सर्वाधिक असते. सायंकाळी अगदी कमी !

शरीरातील पचन,अभिसरण ,मनोव्यापार  एवढच नव्हे तर औषधाच अभिसरण आणि परिणाम ते औषध कुठल्यावेळी घेतल्या जात यावर अवलंबून असतं. निसर्गाच्या गतीशी समतोल कसा सांभाळता येईल, हे ‘क्रोनोबॉयोलॉजी’ अभ्यासाचं उद्धिष्ट आहे. अशावेळी नैसर्गिक परिवर्तनाचा आणि प्रकृतीचा विचार करून प्रत्येक कार्यक्रमाचे जे विधिनिषेध आणि प्रमाण दिनचर्येने ठवले पाहिजे  ते आरोग्य टिकविण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

Tips: Healthy eating is about eating smart. Transform your eating habits with these easy tips. Get healthy with a subscription to Healthy Food Guide magazine. Delicious healthy recipes and expert nutrition advice will be delivered to your door every month. Your source for reliable health information & guides

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu