पावसाळ्यात घ्या पाण्याची काळजी !




care in reain seasonपावसाळ्यात पाण्याच्या साठवणुकीची किंवा निचऱ्याची योग्य व्यवस्था नसेल तर ते साठवून राहते. अश्या पद्धतीने जागोजागी साठवून राहिलेल्या पाण्यात अनेक जीवजंतू वाढीस लागतात. शिवाय या दिवसात तापमानही कमी असते आणि वातावरण ढगाळ असते. हे ढगाळ वातावरण अनेक रोगांना व विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या जीवानुसाठी पोषक ठरते. मुख्यत्वे या दिवसात पाणी दुषित होण्याचे प्रमाण फार असते. आणि यातूनच पोटदुखी,उलटया,जुलाब,कावीळ असे विकार निर्माण होतात. त्यामुळे पाणी उकळून, गाळून, किंवा पुरेसे निर्जंतुक करूनच पिणे केव्हाही हितकर ठरते. साधारणत: पावसाळ्यात होणारे कावीळ हि हेपिट्यटिस ए. किंवा सी. या प्रकारची असते. याचे मुख्य कारण म्हणजे दुषित पाणीच होय. यात सुरवातीस अशक्तपणा, ताप येणे, जेवणाची इच्छा नसणे, हि लक्षणे आढळतात. या अवस्थेत उपचार न झाल्यास अन्न पचन न होणे,लिव्हरला सूज येणे. या प्रकारच्या समस्या येतात. पुढे हि रक्तात मिसळतात, व मेंदू पर्यंत पोचतात. या परिणामी रुग्ण कोमा मध्ये जाण्याची शक्यता असते. आणि याचा परिणाम किडनीवरही होतो. या करीता याचा इलाज वेळीच होणे फार महत्वाचे आहे. पण सांगाचे झाले तर आपल्या कडे काविळीवर गावठी इलाज करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. मग यातून विकार बरा न झाल्यास नंतर डॉक्टर कडे धाव घेतली जाते. पण असे होते कि तोपर्यंत विकार बराच बळावलेला असतो. नंतरच्या इलाजाचा फायदा होऊ शकत नाही व धोका पत्करावा लागतो. त्यामुळे याचे प्राथमिक लक्षणे दिसताच योग्य तपासणी,निदान आणि औषध उपचार यावर भर द्यायला हवा. क़ाविळ बरा झाल्यावरही डॉक्टरांनी सांगितल्या शिवाय उपचार बंद करू नये. आपल्याच मनाने उपचार बंद केल्यास अथवा पथ्य न पाळल्यास कावीळ परत उलटू शकतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड