मधुमेह(Diabetes), रक्तदाब(Blood pressure), या आजारां बरोबरच दम्याचे प्रमाणही हल्ली वाढलेले दिसतात घटत चाललेली रोगप्रतिकारक शक्ती, वाढते प्रदूषण (Alergy), आणि व्यसन यामुळे दम्याच्या रुगणांमध्ये वाढ दिसते. या विकारांत श्वासोच्छश्वासादरम्यान फुफुसांचे आकारमान चटकन नैसर्गिक स्वरूपांत येत नाही. त्यामुळे प्राणवायूची गरज भागवणे फुफुसांना जमत नाही. परिणामी रुग्णाला दम लागतो. रात्री आडवे झोपल्यांनंतर फुफुसांची क्षमता आणखी कमी होते. त्यामुळे कित्येक दमाकऱ्याना रात्रभर बसून राहावे लागते. दमा कशामुळे होतो हे जाणून घेणे हे येथे आवश्यक ठरते. धूर, धूळ, अति थंड वातावरण तिखट, तळलेले अति मसालेदार पदार्थ, सतत खात राहणे व्यायाम न करणे, दही,श्रीखंड यां सारखे आंबट पदार्थ अति प्रमाणात खाणे, दिवसा झोपणे या कारणांमुळे दमा होऊ शकतो. या शिवाय सर्दी पडसे, नाक (Nose) सतत चोंदलेलेकिंवा गळत राहणे या तक्रारी कडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचे रुपांतर द्म्यात होवू शकते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही दमा होऊ शकतो. दमा टाळायचा तर जीवनशैली , आहार आणि व्यायामाचे नियोजन तज्ञांच्या सहायाने काळजीपूर्वक करायला हवे.
Care for Asthma : Astana is the rare disease found in the world, mainly because of the pollution and blockage create in heart. care your asthma.