अतिसार
Like
Like Love Haha Wow Sad Angry

atisar ulcerअतिसार हा एक विशेष करून पावसाळ्यात होणारा उपद्रव आहे. आधुनिक वैद्यका नुसार अतिसार हा जन्तुजन्य असू शकतो अथवा कधी कधी जंतूच्या उपद्रवाविनाही होऊ शकतो. आतड्यांच्या अंत त्वचेला सूज येणे आतड्यांवर परिणाम करणारी औषधे घेण, न मानवणारे पदार्थ खाणं  अशा कारणांन मुळेही अतिसार होतो. आयुर्वेदातही अतिसाराची कारणे थोडीबहुत अशीच आहे. किभूना बहुतेक सर्व विकारांची कारणं आयुर्वेदान ‘आगंतु’ अथवा ‘नीज’ अशी मानली आहे. आता हे ‘नीज’ रोग जन्मत: असलेल्या विकृतीमुळेहोतात . अथवा प्रज्ञापराधामुळे होऊ शकतात. अश्या प्रज्ञांपराधामुळे अतिसार होऊ शकतो. अवेळी आहार, चुकीचा आहार- अग्निमाद्यांमुळे हि अतिसार होऊ शकतो म्हणजे अग्निमाद्य-अजीर्ण अतिसार- अंतत्वचेला दुबळेपण, अजीर्ण-अतिसार असे चक्र चालू होऊ शकतं. दाल, गहू, भजी यांसारख्या पदार्थांचा आहारातला सामावेश, अती मद्यपान यामुळे अग्नी वर ताण पडतो आणि अंत:त्वचाही नाजूक बनते. म्हणून अतिसाराच्या चिकित्सेत तज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असली तरीदेखील सुरवातीच्या अवस्थेत काही बाबी लक्षात ठेऊन घरगुती उपाय करणे महत्वाचे ठरते.  इथे एक लक्षात घ्याव कि एक-दोन वेळ ढाळ झाले कि, आतड्यांची हालचाल कमी करणारी काही औषध देऊन अतिसाराचा वेग ताबडतोब कमी करायची पद्धत आजवर आधुनिक औषध शास्त्रात मान्य होती पण आता असे केल्याने आतड्यांत साचून राहिलेली ‘टोक्सिंन्स’ हानिकारक असतात. अशा अनुमानाप्रत आधुनिक वैद्यक आलेलं आहे. त्यामुळे ‘आम’ जाईपर्यंत जुलाब थांबू नये हे आयुर्वेदाच प्रतिपादन अगदी योग्य आहे. दुर्गंधीयुक्त मल बाहेर पडला, बुळबुळीत चिकटा गेला आणि स्वच्छ पाण्यासारखे जुलाब होऊ लागले की मगच जुलाब थांबवायचं औषध द्याव. जायफळ हा घरातील पदार्थ आतड्याची गती कमी करतो. आणि त्या बरोबर सुंठ आणि तूप घेतलं की, पाचक अग्नीची कार्यक्षमता वाढून मुळ कारण दुरुस्त केलं जातं म्हणून जायफळ,सुंठ आणि तूप यांचा अतिसारात फायदा होतो. म्हणून पावसाळ्यात शक्यतोवर या वस्तू घरी अवश्य ठेवाव्यात.

तत्पूर्वी महत्वाच म्हणजे अतिसार सुरु झाल्यास लंघन करावचं. सौम्य अतिसार असला तर लंघनानेच बर वाटेल. पाणी प्याव पण ते पाणी औषधी युक्त म्हणजे पाणी उकललेल असाव  पण उकळताना सुंठ आणि वाळा टाकावा. बटव्यातल्या औषधां पैकी अतिविष आणि  कुड्याच पाळ हि औषध अतिसारावर उपयोगी पडणारी. कुड्याच चूर्ण आणि अतिविशाच चूर्ण (५०० मि. लि ग़्राम ) घेऊन मधा बरोबर तीन वेळा घ्यावं. भूक चांगली लागली तरच भाताच पेज, मनुकाच पाणी, लाह्यांच पाणी, रव्याची कांजी घ्यावी. आणि या पदार्थात जिरं, ओवा , सैंधव, पिंपळी, सुंठ  यातील जे काही सहज उपलब्ध असेल ते चिमुटभर घालावं. तसेच डाळिंब हे अतिसारावर गुणकारी आहे. बर्याच वेळा डाळिंब हे मुळात पचन वाढविणारे असल्याने ते अतिसार व मलावरोध दोन्हीत उपयोगी आहे. डाळींबाच्या सालीचा मात्र अतिसारावर उपयोग करावा.

An ulcer is a discontinuity or break in a bodily membrane that impedes the organ of which that membrane is a part from continuing its normal functions.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu