हल्ली वर्षभर उपलब्ध होणारे सफरचंद चवीला आंबट-गोड लागणारे व पौष्टिक, पथ्यकारक, तृषा-शामक, पित्त व वायू नाशक व आतड्यांना सुदृढ करणारे असे हे बहुगुणी फळ आहे. त्यातील ‘pyktin ‘ हा घटक शरीरात साठलेल्या कफाला पातळ बनवितो. त्सेच विषारी द्रव्ये नाहीशी करण्यात उपयुक्त ठरतो. पटातील आम्लता कमी करण्यात तो खूपच उपयोगी ठरतो. त्यातील घटकां मुळे हृद्य, मेंदू, यकृत आणि जठर सुदृढ बनते. त्यामुळे भूक चांगली लागते, रक्तात वाढ होते. त्यात थोड्या प्रमाणात ‘ ए. जीवनसत्व आणि तांब्याचे क्षार देखील असतात. लहान मुलांना जुलाब होत असल्यास सफरचंद (Apple) अत्यंत उपयुक्त ठरते. त्यात रेचक हा गुण असून त्यातील घटका मुळे जुलाब थांबण्यास मदत होते. पोटातील तसेच आतड्यांतील निरुपयोगी जीवाणूंचा सफरचंदामुळे नाश होतो. कावीळ, मुत्रपिंड व यकृतातील व्याधींवर देखील सफरचंद (Apple) उपयोगी पडते. सांधेदुखीठी त्याचा उपयोग होतो. सफरचंद चावून खाल्ल्यास दातातील किटानुंचा नाश होतो तसेच दातदुखीतही ते उपयुक्त ठरते. ते खातांना सालासहित खावें. रोज एक सफरचंद खाल्ल्याने मनुष्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्या परिणामी कुठलेही आजार होत नाही. सहा महिण्यानंतर मुलाला उकडलेले सफरचंद पेस्ट करून प्रमाणशीर द्यावे. ते अतिशय उत्तम ठरते.
Apple is useful for health, Apple is the most useful fruit, it is useful on the various disease, it is useful on the disease like cancer, you must be it is everyday.