श्री सार्थ ज्ञानेश्वरीतील कथानक !
पाहे पां श्री शंभूची प्रसंन्न्ता । तया उपमन्युचिया आर्ता । काय क्षीराब्धी दुधभाता । देईजेचिना ।
५-११ अर्थ — उपमन्य वशिष्ठ कुलोत्पन्न व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा. घरी अठराविश्वे दालीद्रे असल्यामुळे त्याची आई त्याला दुधा एवजी पाण्यात पीठ कालवून ते दुध म्हणून देतं असे एकदा उपमन्यू आपल्या मित्राकडे खेळावयाला गेला असता. तेथें त्याला प्रत्यक्ष गायीचे दुध पिण्यास मिळाले. घरी परत आल्या नंतर त्याने आईला दुध पिण्यास मागीतले.तिने नेहमी प्रमाणे पाण्यात पीठ कालवून त्याच्या पुढे ठेवले. तो तें पीईना. तेव्हा त्याची आई त्यास म्हणाली, ‘खरे दुध पिण्याचे तुझें पुण्य आहे कोठें?’ हे आपल्या मातेचे वाक्य ऎकुन ‘दुध प्यावयास मिळावें ‘ म्हणून शंकराची उपासना केली. श्री शंकर प्रसंन्न होऊन त्यांनी त्यास क्षीरसागराचे अधिपत्य दिलें. त्याच्या पासून भगवान श्रीकृष्णांनी शैव दीक्षा घेतली होती.
पाहें पा सावजें हातिरू धरिलें । तेणें त्या काकुळती मातें स्मरिले । कि तयांचे पशुत्व वावो जाहलें । पावलिया मातें ।
९ – ४४२ अर्थ– गजेंद्र – स्वायंभूव मन्वंतरांतील पांण्द्य देशचा इन्द्रद्यूम्न नावाचा राजा याला अगस्ती ऋषींचा शाप झाल्यामुलें हा गज योनीत जन्मास आला.आपल्या परिवारासह एकदां त्रिकुट पर्वता वरील सरोवरात हा जलक्रीडा करीत असतां, नक्राने याचा पाय धरिला न्क्राचे व त्याचे हजार वर्षें त्यांचे युद्ध झाले. गजेन्द्राचा सर्व परिवार, तो संकटात पडलेला पाहून त्यास सोडून निघून गेला. आतां या प्राणांतिक संकटातून आपनास सोडविणारा दुसरा कणी नाही असे जाणून त्याने एकाग्र अंतकर्नाने भगवंताचा धावा केला. भगवंतानि येउन त्याची त्या नक्रा पासून सुटका केली. ( हि गोष्ट चवथ्या तामस मन्वंतरांत घडली.)
हिरण्यकशिपू व त्याची राणी कयाधू यांचा मुलगा प्रल्हाद याची कथा ज्ञांनेश्वरी तीलच आहे. !
९–४५१ अध्यायातून — स्वायंभुव मनूच्या पुत्र जो उत्तानपाद व त्याची पत्नी राणी सुनीती यांचा पुत्र ध्रुव एकदा हा आपल्या बापाच्या मांडीवर बसू लागला असतां, त्याच्या सापत्न मातेने त्याचा धिक्कार केला, त्यामुळें त्याला वाईट वाटून पाच वर्षाचा असतानाच, तो मधुवनात गेला आणि नारदाच्या उपदेशाने त्यानें उग्र तप केले, भगवान प्रसंन्न झाले व त्यास ध्रुव पदी बसविलें याने अनेक यज्ञ केले. व शेवटी वैकुंठलोकीं गमन केले.