वाताच नियंत्रण चांगलं राहावं यासाठी आयुर्वेदातील उपायाकडे वळावं मग भले या क्षणाला त्यांच ‘सायंटीफीक इव्हांल्युएशन’ नसेना कां झालं ! वात दोषाला आटोक्यात कसं ठेवायच याच एका शब्दातल उत्तर म्हटले कि – तेल! आणि आहार सल्ला स्निग्धानि, लवणोषणानी, भोज्यांनी, स्निग्ध, खारट, उष्ण खावे. वाताच कार्य प्राकृत – सामान्य करण्याकरीता तेलाचा वापर करावा. तिळ तेल हे सर्वात उत्तम म्हणून जमेल तितक्या माध्यमातून तिळ तेलाचा उपयोग करावा. तिळ तेलाच अभ्यंग (मालिश/ massage ) केल तर स्पर्शनेंद्रियांच, त्वचेच आरोग्य वाढत, टाळूवर तेल जिरवणे, कानात टाकणे याही गोष्टी वाताला नियंत्रण करतांत. वाताचे ईतके दूरगामी परिणाम होवू शकतात. वातदोष वाढल्यास तिळाचे मात्राबस्ती (पिचकारी )म्हणूनच गुणकारी ठरते.ती म्हणजे मुलभूत चिकित्सा आहे. सर्व वात विकारांच ते कारण असत मोठ्या आतड्यांत आणि मलाशयांत थंडीमुळे वात-दोषांच (Cold Vat) कार्य बिघडत,म्हणून त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि पेयपान गरम असाव, गरम अन्न,गरमपाणी (पिण्याला व स्नानाला) असावं. आणि गरम वस्त्र ही हितावह ठरतात.थंड हवा (एअरकंडिशनिंग ) वाताला घातक आहे, ते नेहमी टाळावं.
आहारात वात बिघडवीनारे पदार्थ टाळावे, तुरट,कडु आणि तिखट रसाचे पदार्थ वात औषधाचे कार्य कमी करतात. म्हणून हे खाणे टाळावे. त्याएवजी गोड,कमी खारे, कमी आंबट खावे. भाज्यांवर भर न देता भात, भाकरी, पोळी, चटणी कोशिंबीर असे पदार्थ खावेत. जेवणात कचं तूप, तेल, दुध-साय असावी. तळकट,अति तिखट, कडू, तुरट पदार्थ टाळावेत.तसेच फरसाण, भजी, वांगे, वटाणा, बटाटा, हरबरा हेही टाळावेत, वात प्रकृती साठी उत्तम म्हणजे ताजा तूप घालून गरम भात, गोड खिरी, भाकरी-चटणी व तेल. ती चटणी लसून, शेंगदाणे, जवस, तिळ यांची असावी, एरंडेल तेलाचे मोहन घालून भाकर, किंवा पोळी बनवून खाणे या प्रकृतीला फार मानवते. या व्यक्तींनी शीतपेय अजिबात घेऊ नये. त्या एवजी लिंबाचे सरबत किंवा ताक घ्यावे.
वात प्रकृतीला विश्रांतीची हेळसांड करू नये. आणि शक्यतोवर रात्री जागरण करू नये. कारण त्यामुळे लगेच अपचन होऊन आतड्यावर परिणाम होतो. कारण मनाचा व आतड्यांचा धनिष्ट संबंध असतो. लगेच ‘सिग्नल्स’ आतड्यात जाउन अपचन होते. वात प्रकृतीच्या व्यक्तींना अनियमित आहार अधिक अपायकारक ठरतो. कारण आधीच त्यांच्या पक्वाशय व मलाशयाच कार्य निट नसतं. त्याच ताण नियमित आहार व वातानुकुलित हवा अशी भर पडत गेली म्हणजे जठरआन्त्राशयावर परिणाम होतो आणि तो लक्षण सुरु झाला की व्यक्ती डॉक्टरांकडे चकरा टाकतो. त्यांच्या कोणत्याही उपायांनि काही एक आराम होत नाही. कारण हि सर्व वातामुळेच त्रास असतात, त्याच्या जोडीला पित्त-कफ हे सुद्धा दोष असू शकतात. पण या सर्व गोष्टीना पथ्यानेच गुण येतो.
आधुनिक वैद्यकांनी अशा लक्षण समुहाला इरिटिबल बॉवेल, चिडचीडलेले आतडं असे नाव दिले ! दुसरे म्हणजे प्रकृती बद्दल अति सजग ,पण मुळात वात (Wat) प्रकृती असलेल्यांनचा! वजन आटोक्यात ठेवण्यासाठी कच्च्या भाज्या खाउन खुपसा व्यायाम करून (आणि स्निग्ध पदार्थ संपूर्णतया वगळून ) हि मंडळी शरीरातील वाताचा तोल बिघडवतात आणि वय उतरणीला लागले असेल तर निसर्गही तो तोल ढळायला मदत करू लागतो, या व्यक्तिंनी आहार सांभाळावा, व्यायाम बेताचाच करावा आणि योग ध्यान इ. उपायांनी मनाचे संतुलन राखावे. कमी खर्चात हे वात उपाय चांगले आहेत.
मुळात वात प्रकृती असलेल्यांनी ‘दोष’ वाढविणारी कारणे समजून घेऊन काही गोष्टींचा आधीपासूनच त्याग करावा. म्हणजे वात प्रकोप होणार नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाताला जागा करायला पोकळ्या मोकळ्या लागतात, आमामुळे त्या चोंद्ल्या तर वाताच काम अडतं म्हणून ‘आम’ उत्पन्न होऊ देऊ नये. आयुर्वेदात ‘समतोल’ हा केंद्रस्थानी आहे. नुसते मधुर रस घेउन कफाला निमंत्रण देता कामा नये. वात्स्थान बळकट करायला काही आयुर्वेद औषधे ही आहेत. त्या साठी तज्ञांकडून परीक्षेची आवश्यकता असते. कारण कुठले स्थान अधिक दुर्बळ आहे हेही जोखावे लागते. आणि तिसरे म्हणजे कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी परिस्थितीमुळे नाईलाज होण्याची शक्यता असते. उदा. कोणी ऑफिस मध्ये असतील तर एअरकंडीशनर टाळू शकत नाही, तर कोणी वेळेवर जेवण करू शकत नाही, आणि कोणी ‘ताण’ घेण्याचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही. अश्या वेळी तज्ञाचां सल्ला घेऊनच औषध योजना व पंचकर्मातील उच्च चिकित्सा करून घ्यावी