“अरे देवा! मी इंद्रियांच्या अधीन झाले माझ्या मोहाचा विस्तार तर बघा ! मी अशा दुष्ट पुरुष्या कडून, विषय-सुखाची लालसा करायला नको, ज्यांचे काही अस्तित्वच नाही! किती खेदाची गोष्ट आहे!. मी खरोखरच मूर्ख आहे. बधा तर खरे, माझ्या अगदी जवळ,हृदयातच माझे खरे स्वामी परमात्मा विराजमान आहेत !ते वास्तविक प्रेम, सुख आणि पर्मार्थाचे खरे धन देखील देणार आहेत. जगातील पुरुष अनित्य आहे. आणि परमात्मा नित्य आहे.
अरे देवा ! मी ईश्वराला सोडून दिले. आणि या तूच्छ मनुष्याची संगत केली, की जे माझी एक ईच्छा पूर्ण करू शकत नाहीत. कामनापूर्तीची गोष्ट तर लांब राहिली उलट ते दु:ख, भय, आधी-व्याधी, शोक आणि मोहच देतात. ही माझ्या मूर्ख पणाची शर्थ झाली कि मी त्यांची संगत करते. मोठ्या खेदाची गोष्ट आहे कि मी अत्यंत निंदनीय प्रवृत्तीचा आश्रय घेऊन निष्कारण माझ्या शरीर व मनाला क्लेश व दु:ख देते. विनाकारण माझे हे शरीर विकल्या गेले आहे. लंपट, लोभी, निंदनीय लोकांनी याला विकत घेतलेले आहे. पण मी ही किती मूर्ख आहे की या शरीराद्वारे धन आणि रति-सुख ईत्छिते. धिक्कार असो माझा.
हे शरीर एक घर आहे. य़ात हाडांचे वाकडे-तिकडे बांबू आणि खांब आहेत. चामडी, रोग, नखांनी हे आच्छादिले आहे. त्यात नऊ दरवाजे आहेत. यात संचित संपत्तीच्या नावावर केवळ मल आणि मुत्र आहे, मी कशी मुर्ख आहे की स्थूल शरीराला प्रिय समजून याचाच भोग घेते आहे? या शरीराच्या भोगाने बळ,तेज,आरोग्य आयुष्य यांचा ऱ्हास होते आहे, दुर्लभ मनुष्य जीवनाचा विनाश करणे अत्यंत मूर्खपणा आहे!
Human body is the home and we must need to take care of it. that’s why we say “Sharir ek madhir ahe”. Human body is Home.