आईच्या गर्भातील सोsहं प्रभूला दिलेले वचन !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

garbh sanskar

जिवाचा संकल्प . यज्ञ, दान, धर्मे. अनेक पुण्यकर्मे केली तर मी त्या पुण्याईच्या योगाने स्वर्गात जावून ईंन्द्रादिकांप्रमाणे सुख-विलास अमृतपान करीन; अस्या प्रकारच्या संकल्प ध्यासात जीव राहतो पण देहाचा अंत होताच केल्या कर्मा प्रमाणे जीव वासने पोटी पुन्हा जन्मास येतो. हि वासना अविद्ये पासून तयार होते. अनादि ब्रम्ह अनादि माया हि मायामय जीवसृष्टी वासनामय लिंगदेह प्रथम पित्याच्या उदरी संचरतो. कोणी जीव- श्वासरंध्रे, कोणी फळ पाने –यांच्या द्वारे अथवा धान्यांत प्रवेशून त्या द्वारे पित्याच्या उदरी संचरतात. व तेथे सप्त धातूत एकएक सप्तक राहतो व पहिल्या सप्तकी रसांत, दुसर्या सप्तकी रक्तांत, तिसर्या सप्तकी मासांत, चौथ्या सप्तकी मेदांत.. अनन्य सप्तकी मज्यांत सहाव्या सप्तकी अस्थींत व सात्व्यास्प्तकी शुक्रांत येतो. एकोण पन्नासव्या दिवशी शुक्ररूपेपितृकोठारी वास करून तेथे मातृगर्भकाळी पितृकोठारांतून योनिमुखें बुद्बुदांकारे आंत प्रवेश करतो. त्यावेळीं पित्याचे ‘शुक्रं; अधिक असेल तर पुत्र प्राप्ती, व मातेचे ‘शोणित’ अधिक असेल तर कन्या प्राप्ती, व दोघांचे शुक्रशोणित समान  असेल तर ‘नपुसक’ निपजतो. ज्या, ज्या गुणांत ज्या, ज्या प्रकारे जसजसे स्त्री-पुरुष मैथुन समयी रमतात. तसेच गुण वअवयव उत्पन्न होतात. यांत मुळीच संदेह नाही. प्राणापानाच्या बलाने योनीमुखांतील ‘शुक्र’ उसळून त्याच रात्री दह्या प्रमाणें गर्भाचा गोळा जसा पक्षी-अंडाकार बनतो.व नवमांसपर्यंत त्या गोळ्याचे काय काय स्वरूप होते, ते म्हणजे

१) पहिल्या मासीं — शीर, डोळे, कर्ण, नासिक व मुख. तयार होतात.

२)दुसर्या मासीं — भुजा तयार होतात.

३)तिसर्या मासीं– हृद्य, उदर तयार होते

४) चवथ्या मासीं — हस्त व पाद तयार होतात

५) पाचवे मासी — गुद ,व मुत्रेन्द्रीय तयार होतात.

६) सहावे मासी — अस्थी  शिरा, त्वचा,व रोम तयार होतात

७) सातवें मासीं — नखें व केस तयार होतात

८)आठवे मासीं — मागील जन्म जातीचे स्मरण होते

९) नववे मासीं– निमिषोन्मीषी सोsहं स्मरण सुरु होते. नंतर नवव्या मासीं पूर्णत: अखंडीत सोsहं शब्दांनी काकुळतेनें, दिनतनें, लीनतेनें, अनन्यत्वानें, सोsहं  प्रभूची विनवणी करून जीव म्हणतो, हे द्याधना सोsहं प्रभू मला या गर्भ कारागृहातून तू लवकर बाहेर काढ! मी तुला कधीही विसरणार नाही.मी तुझे नित्य नाम घेईन,रूप पाहीन, हे सोsहं प्रभू मला बाहेर काढ! काढ! काढ! लवकर बाहेर काढ !!! अशी विनवणी करतो. या सत्य संकल्पाच्या आणि काकुळतेच्या विनवणीने सोsहं प्रभूला द्या येउन गर्भ-कारागृहातून सुटका करतो. (म्ह्नजेच जन्म होतो) नंतर जन्म होताच मायेचा वारा लागून कोsहं म्हणजे (तू कोण ? / who are you? ) असे म्हणून जीव सोsहं प्रभूस विसरून कोs हं— कोs हं, करितो. याच मायेच्या पसार्यात तो पुढे ईश्वराला विसरून पापाची फलश्रुती, ”दु;ख” पुण्याची फल श्रुती म्हणजे ”सुख” भोगत असतो.

Garbh Sanskar:  Agreement to the Lord, the mother’s garbhatila. Mother is life, she gives us life. read this article based on Garbh sanskar.  Agreement to the Lord, the mother’s garbhatila.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu