आपल्या शरीरात जीवनसत्वे कमी झाले कि, आपण वेगवेगळ्या महागड्या औषधींचा वापर करतो,हि औषधे जीवनसत्वे खनिजद्रव्यापासुन तयार केलेली असतात. कधी फायदा होतो तर कधी होत नाही. खर म्हणजे आपण रोजच्या आहारात ज्या भाज्या खातो त्यात विविध प्रकारची जीवनसत्वे असतात, या भाजीपाल्यांच्या रसात कर्करोगांसारख्या दुर्धर व्याधींवर उपाय करण्याची ताकद असते. संधिवात, अल्सर, डोळ्यांचे विकार, दातांचे रोग, चर्मरोग इ. या रसांचा उपयोग होऊ शकतो. ताज्या भाज्यांच्या रसातून जीवनसत्व, क्षारधर्मीय तत्व, पाचक द्रव्य, हार्मोन्स निर्मितीस उपयोगी तत्व मिळविता येतात. याशिवाय अल्प परंतु उच्च जातीचे प्रोटीन्स, फ्यट्स, व पिष्टमय पदार्थहि मिळतात. तसेच या पाले भाज्यांतून शरीरास आवश्यक असे ‘सेल्युलोज’ मिळतात.
चवळीची भाजी : पाले भाज्यांन मध्ये चवळीची भाजी फारच उत्तम आहे. या कच्च्या भाजीचा रस अल्सर, श्वेतप्रदऱ, यकृताचे विकार व ईतर जननेन्द्रियाच्या रोगात उपयोगी पडतो लहान मुलांना एक चमचा रस थोडे मध घालून दिल्यास बाजारात मिळणार्या ड्राप्स पेक्षा अधिक उपयोगी पडतो, कुपोषण व अनिमियाच्या रोगातहि याचा उपयोग होतो, या भाजीचा रस डोके धुण्यासाठी,त्वच्या स्व्च्छ करण्यासाठी व केसांची वाढ होण्यासाठी तसेच केस मुलायम होण्यासाठी करता येतो
गाजराची पाने : गाजराच्या पानाने कित्येक आजार आपल्याला सहजासहजी घालवता येतील. गया भाजीच्या एक ग्लास रसामध्ये जर थोडे लिंबुरस व थोडे मीठ घातले तर व्हिटामिन ए.बी.सी. आणि क्यल्शियम लोह इ. द्रव्ये मिळतात. पचन सुधारते, मूतखडे विरघळून नाहीसे होतात. डोळे, फुफ्फुस व यकृत सुदृढ होते. हातापायाची व डोळ्याची आग थांबविते. व तारुण्य सुधृढ करते. तोंड येणे पायोरीया या आजारातही याचा उपयोग होतो. थोड्या रसात हळद पावडर घालून चेहर्यावर लावण्यासाठी क्रीम तयार करता येते.
पान कोबी : कोबीच्या उपयोग रात आंधळेपणा रुक्ष व कंठ सुकणारी त्वचा, लघवीत एसिडीटी, मुत्रपिंडाचे विकार, मधुमेह हृदयाची धडधड, कावीळ इ. रोगांवर इलाज होतो.
कोथिंबीर : खाद्य पदार्थात सुगंध दरवळण्याकरीता सर्वत्र भारतात या पानाचा उपयोग करतात. रोज एक चमचा रस तेवढ्याच मधात घालून सेवन केल्यास जीवन सत्व अ.ब. क़. व लोह मिळते. कोथिंबिरिच्या चमचा भर रसात सोन केळीच्या एक,दोन बिया वाटून दिल्यास देवी,गोवर आजार होत नाही.
कढीलिंब (गोड्निंब पाने ) : फडणी मध्ये काड्य पदार्थांना सुगंध येण्याकरिता आपण कढीलिंबाची पाने उपयोगात आणतो या पानांचा लहान चमच्याने दोन चम्मच रस व त्यात थोडा लिंबाचा रस आणि थोडे मध घेतल्यास मज्ज्यासंस्थेची दुर्बलता, हाडांचे विकार इ. वर चांगला गुण येतो. खास तर मधुमेहाच्या रुग्णांनी कढीलिंबाची दहा पूर्ण पाने तीन महिने दररोज चावून चावून खाल्ल्यास मधुमेह बरा होतो. तसेच हा रस काजळा सारखा डोळ्यांना लावल्यास द्रुष्टी सुधारते. व मोतीबिंदूची वाढ थांबते.
शेवग्याच्या झाडाची पाने : या झाडाच्या पानामध्ये ईतर खाद्य पदार्थांच्या तुलनेत बर्याच जास्त प्रमाणात जीवनसत्व व खनिज द्रव्य मिळतात. एक कप रसात जीवनसत्व अ. ९ अंड्यांच्या बरोबरीचे, एक कप बादाम, दीड किलो लोणी व ८० कप दुधा (गाईच्या दुध) बरोबरीचे असते शेवग्याच्या पानांचा रस व मूऴयाच्या पानांचा रस सम प्रमाणात एकत्र करून मुलव्याधी वर लावल्यास खूप आराम मिळतो. आणि याच रसात थोडा लिंबाचा रस मिसळून चेहर्यावर लावीत राहिल्याने मुरमे नाहीशी होतात.
कारले : कार्ल्याच्या रसात रक्त – शर्करा कमी करणारे ‘च्यारेटिन’ नावाचे द्रव्य असते. रोज सकाळी हा रस एक चमचा घेतल्यास वजन कमी होते. एक कपभर रसात थोडे लिंबुरस पिळून चार, सहा महिने नियमित घेतल्यास सिरोसीस, व ईतर चर्म रोग बरे होतात.
काकडी : खरे तर काकडीचा हंगाम उन्हाळ्याचा,परंतु ओलिताच्या सोयी मुळे आता काकडीचा हंगाम बाराही महिने सुरूच असतो त्यामुळे काकडी बाराही महिने बाजारात मिळते. एक ग्लासभर काकडीच्या रसामध्ये थोडे लिंबू पिळून घेतल्यास ब्लडप्रेशर वर चांगलाच गुण येतो. तसेच जलोदर, मुत्रपिंडाचे विकार, हगवण, ओकारी (ometin ) इ. मध्ये उपयोगी आहे.
पालक :– पालकाच्या रसात विशेष करून अत्यावश्यक एमिनो, एसिड, लोह, जीवनसत्व ‘अ’ आणि फोलिक एसिड असते.पालकाच्या रसाचा उपयोग आबालवृद्धांना सर्व प्रकारे हितकारक ठरला आहे. गाजर, काकडी, पालकाचा रस, नियमित सेवन केल्यास सर्वच आवश्यक व्हिटामिनस् व खनिज द्रव्य मिळतात. नारळाच्या पाण्या बरोबर ताज्या पालकाचा रस घेतल्यास गर्भावस्थेत हाय ब्लडप्रेशर,हृदयरोग, व मुत्रपिंडाच्या विकारात तसेच उन्हाळ्यात अति घाम जाणे यावर याचा उपयोग होतो. पालकाच्या पानांचा मुळासकट रस काढून त्यात थोडा ब्राम्हीच्या ताज्या पानांचा रस मिसळून थोडे मध घालून घेतल्यास उत्तम ब्रेनटोनिक तयार होते.
अश्या प्रकारे आपण रोजच्या आहारात ज्या भाजी पाल्यांचा उपयोग करतो त्यांचा कच्चा रस कितीतरी विलक्षण गुणकारी आहे हे आपणास माहिती असायला हवे यावरून सर्वच हिरव्या भाज्या आपले आरोग्य निट सांभाळतात हेही समजून येते .