Why do women have more faith in God than men??? Let us take a new look at faith—from the point of view of women. So, when you get a little discouraged or you can’t understand why certain things happen to you.
सुर्य स्थावर- जंगम जगताचा आत्मा आहे. सूर्य आणि चंद्र दोघे माया विशिष्ट ब्रम्हचे डोळे आहेत. त्यांच्या द्वारे जड आणि चेतन जगताला जीवन मिळते. स्त्री आपल्या पार्थिव तत्वाद्वारे हे जीवन प्राप्त करते आणि पुरुष आपल्या अणुतत्वाद्वारे जीवन प्राप्त करतो. सूर्याचे सुमारे एक हजार किरण आहेत. ज्यांचे गुण आणि प्रभाव वेगवेगळे आहेत.
पुरुषाचे तत्व सूर्याच्या पहिल्या व दुसर्या किरणाला अधिक आकृष्ट करते, आणि स्त्रीचे तत्व सूर्याच्या तिसर्या किरणाला खेचते. सूर्याच्या तिसर्या किरणात तमोगुणाचे प्रमाण जास्त असते. स्त्रियांच्या पार्थिव केंद्रात देखील तमोगुणाचे अंश अधिक आहेत. कारण त्या मायेच्या अधिष्ठात्री शक्ती आहेत. तमोगुणाचे अधिष्ठान असल्यामुळे आणि तमोगुणाचे आकर्षण केल्याने स्त्रियांमध्ये श्रद्धा-विश्वासाचे अधिक प्रमाण असते. एकतर सत्वगुणामध्ये श्रद्धा-विश्वासाचे प्रमाण जास्त असते. कारण सत्वगुणी जीव ज्ञानानुपूर्वी असतात, अथवा तमोगुणी जीवांमध्ये श्रद्धा-विश्वासाला प्राधान्य असते, कारण तमोगुणामध्ये शंकासमाधानासाठी अवकाश नसतो. व स्त्रियांमध्ये तमोगुणाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांच्यात श्रद्धा-विश्वासाची भावना प्रबळ असते. म्हणून पुरुषापेक्षा स्त्रियांना बहकविणे किंवा फूस लावणे अधिक सोपे मानले जाते.
याच श्रद्धा-विश्वासाच्या भावनांच्या बळावर गोपी आणि मीरेच्या प्रेम साधनेने अध्यात्मिक उत्कर्ष साधला आहे. तर दुसर्या बाजूने नारीच्या याच भावनेचा गैर फायदा घेवून दुराचारी व भोगी लोकांनी, नीच लोकांनी नारीला पथभ्रष्ट करून आपल्या नारकीय वासनांच्या तृप्तीचे साधन बनविले आहे. भोळ्या-भाबड्या स्त्रिया कुपात्र लोकांपासून बेसावध राहिल्या मुळे आपले सर्वस्व गमावून बसतात. म्हणून भारतीय शास्त्रकारांनी नारीचे निरंतर रक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. जोपर्यंत कन्या आहे तो पर्यंत पित्याद्वारे रक्षणीय आहे, विवाह झाल्या नंतर पतीद्वारे रक्षणीय आहे आणि वृद्ध झाल्यावर पुत्राद्वारे रक्षणीय आहे.
स्त्रीयांसाठी हे योग्य आहे की त्यांनी या निसर्गाने दिलेल्या श्रद्धा-विश्वासरुपी संपत्तीचे दुराचारी,पाखंडी, धुर्तांपासून रक्षण करण्यास कधी ही सावध असावे व रक्षण करावे. नोकरी, ऑफिसमध्ये प्रमोशनाच्या प्रलोभनांना फसून कामविकारास बळी पडू नये. आपल्या श्रद्धा-विश्वासाला खर्या अध्यात्मिक क्षेत्रात लावून आपले जीवन धन्य धन्य, कृतकृत्य बनवावे.