Rights and Responsibilities: Indian Youth Portal, What then are the rights and responsibilities of the youth of India? More and more young men of this age group are sitting at home in front of their …. nice,opens the eyes of a youth to see his responsibilities..
महत्वाचे मुद्दे : तरून हा आत्म संतुष्ट नव्हे तर असंतुष्ट असतो. , स्वतंत्र भारतातील तरुणांनी राष्ट्रधर्म पाळला पाहिजे, सुराज्य अवतरण्यासाठी तरुणांनी समाज सेवेचा वसा घेतला पाहिजे, तंत्रज्ञान, संरक्षणदल, व्यसननिर्मुलन ई. क्षेत्रात कार्यरत असले पाहिजे, राष्ट्रीय कर्तव्यपालन.
* वाऱ्याचा वेग, सूर्याचे तेज, प्रपाताची आत्मसमर्पणवृत्ती,विद्युल्ल्तेची चंचलता यांचा समन्वय म्हणजेच तारुण्य! पूज्य दादा धर्माधिकारी यांनी तारुण्याची व्याख्या ‘तेज’तत्परता आणि तप ज्यांच्या ठिकाणी वास करतात’ असे व्यक्तिमत्व अशी केली आहे.हे तारुण्य कधी शिवाजीच्या रुपात अवतरले तर कधी विवेकानंदाच्या रुपात.
* आजची तरूणपिढी असंतुष्ट आहे,त्यामुळे ती विध्वंसक कार्य करते.असा आरोप नेहमीच तिच्यावर केला जातो.पण आत्मसंतुष्ट्ता हे तारुण्याचे लक्षण नाही. ते वार्धक्याचे लक्षण आहे. तरून हा नेहमीच असंतुष्ट असतो, नव्हे तो तसाच असला पाहिजे.मात्र हि असंतुष्टता विधायक कार्याच्या कारणी लागली पाहिजे. अध्यात्म्याला संस्कृत भाषेच्या भिंतीत कोंडून ठेवणार्याविरुद्ध संत ज्ञानेश्वरांनी बंड केले. या असंतोष्यातूनच अमृतातेही पैजा जिंकणारी ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या घराघराचे वैभव बनली. थोरल्या माधवराव पेशव्यांनी स्वराज्याचा ढासळता डोलारा सांभाळला. सावरकर, मदन लाल धिंग्रा, चाफेकर बंधू, कान्हेरे यांनी स्वातंत्र्याच्या वेदीवर आत्मबलिदान केले.
* स्वातंत्र्यप्राप्ती नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘बहुजन सुखाय बहुजन हिताय’ अशी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर देखील भारतीय जनता अज्ञान, दारिद्र, बेकारी यांच्या गर्तेतच राहिली. जाती, धर्म, भाषा, प्रांत भेद अधिकच वाढले. म्हणून भारत हा देश एकसंघ राष्ट्राच्या पदास अजूनही पोचलेला नाही। आपमतलबी शक्तींनी आणि व्यक्तींनी राजकीय क्षेत्रात तारुण्याच्या आवेशाचा उपयोग स्वार्थासाठी करून घेतला आणि वर आजचा तरूण विधवंसक आहे असा शिक्का मारला.
* स्वतंत्र भारतातील तरुणांनी एकच धर्म मानला पाहिजे तो म्हणजे राष्ट्रधर्म आणि एकच नाते जोडले पाहिजे ते म्हणजे मानवता व बंधुता अशा राष्ट्रधर्माची आणि मानवतेची जोपासनाकरण्या साठी स्वार्थी व देशविघातक शक्तिंपासून लांब राहणे आवश्यक आहे.