Books are the source of information, books are also our friends. A book like the Ramayana is undoubtedly the best of companions. It offers us all the balm we need when life has given us a rebuff and the world looks cold and uncharitable. But when books are become old we simply discard them. Here is a story of old book. It’s an essay for students.
मी पुस्तक बोलतेय…..
बर्याच दिवसापासून कुणाजवळ आपल्या मनातील बोलाव असे वाटत होते. बरे झाले मी तुमच्या सारख्या सहृदय मनुष्याच्या हाती आले. म्हणूनच तुमच्या जवळ मन मोकळे करायची इच्छा आहे. माझ्या जन्माची कथा वेगळीच आहे. सर्वात पहिले एका लेखकाच्या हातून खूप परिश्रमाने मला लिहिल्या गेले. त्यानंतर मला एका प्रेस मध्ये पाठवण्यात आले. तेथील यंत्रांच्या आवाजाने तर मला बहिरेच करून सोडले. न जाणे असंख्य अक्षराने जोडण्या करीता मला मशिनरी खाली कितीतरी वेळा कुचलण्यात आले. त्या वेळेची आठवण होताच मला आजही घाबरायला होते. त्यानंतर माझ्या देहात सुया टोचण्यात आल्या व मलम लावून माझावर मालिश करण्यात आली व नवनवीन कागद लावून सुंदर बनविण्यात आले. मग तर माझे रूप पाहण्यासारखेच झाले. नंतर मला दुकानाच्या शोकेस मध्ये ठेवण्यात आले.
* काही दिवसांनीच मला ते दुकान सोडून एका व्यक्ती सोबत. त्यांच्या घरी जावे लागले तेच माझे मालक. ते मला फार जपून ठेवायचे. माझा एक एक पान ते वाचायचे व वाचल्या नंतर पानावर काही तरी निश्यान करायचे. त्यांनी संपूर्ण मला वाचल्या नंतर काही दिवस मी तिथेच राहिले. मग मला त्यांच्या मित्राने मला नेले. मला दुसरे घर मिळाले.त्या व्यक्तीने मला आवडतीच बनविले ते मला नियमित वाचत माझी संपूर्ण काळजी घेत. मला चांगल्या ठिकाणी ठेवत. मला धुळीचा स्पर्श सुद्धा होवू देत नसत. त्यांनी पण माझ्या पानावर जिथे जिथे त्यांना आवडीचे वाटत असे तिथे निशाण करीत. तिथे माझी फार कदर झाली मला पण त्यांच्याकडे छान वाटायचे.
* एक दिवस ते प्रवासाला निघाले तेव्हा त्यांनी मलाही न विसरता सोबत घेतले. पण परतीच्या वेळी मात्र मला वाचता वाचता त्यांना झोप आली. मला काळी ठेवले. पण उतरताना ते मला तिथेच विसरले व उतरून गेले. मी काय करणार बिचारी मला काहीच सुचेना. त्या व्यक्ती माझी आठवण कशी विसरलेत हेच कळत नव्हते. मला वाईट वाटले.
* मी तेथेच होते. माझ दुर्भाग्यच म्हणावे लागेल, माझ्या बाजूला दुसरी व्यक्ती येवून बसली.मी त्यांच्या हाती लागले. त्यांनी माझे दोन तीन पाने वाचलीत व मला तेथेच तिरस्कार केल्या प्रमाणे आद्डले.मला बघून त्याला काहीच मजा आली नसावी. मला त्यांचा राग आला खरा! मनात वाटले कि हा व्यक्ती बुद्धू असावा…
* पण त्यांच्या बाजूने त्यांची पत्नी बसलेली होती. ती समजदार व हुश्यार होती. तिने मला लगेच उचलले व माझ्या एक दोन ओळी वाचल्या, व लगेच एकदम खुश होवून माझ्यावर थाप मारली. व चुंबन केल. मलाही हर्ष झाला.
* एक दिवस मी न कळत तिथून एका रद्दी वाल्याच्या हाती लागले. तो बिचारा अशिक्षित, अडाणी तो माझी किंमत काय जाणणार त्याने माझे सुंदर मुखपृष्ठ फाडले. मला त्याच राग आला किती निर्दयी हा… मी माझ्या दुर्भाग्याला कोसत होते. मला माझी चिंता होती. मी कुठल्या व्यक्तीच्या हाती लागले. कि ज्याला माझी किंमत कळू शकत नाही ! मला वाईट वाटत होते. मी एका ढिगार्याच्या बाजूला पडलेली होते. खूप दिवस त्या घाणेरड्या जागी राहिले.मला रडायला येत होते. जुन्या आठवणी जाग्या होत होत्या.
* पण आज मी खुश आहे. कि मी तुमच्या सारख्या सहृदय व्यक्तीच्या हाती लागले. जगात राहून मी बरेच काही जाणले. कुणी दयाळू तर कुणी कठोर,पण कितीही कठोर व्यक्ती असले तरी त्यांचे प्रेम मला मिळाले. त्यांच्या मनातील सुंदरता फुलांप्रमाणे मधुरता मी बघितली आहे. त्यांच्या कडून मला शीतल छाया मिळाली आहे. मी एका लेखकाच्या हातून माझा जन्म झाला असला तरी माझ्या पासून ज्ञान प्राप्त करून घेणार्या कत्येक व्यक्ती मी पाहिल्यात ! हाच अनुभव मला आज आनंद देत आहे…
* तुमच्या हाती येवून मला माझ्या भाग्याची किंमत कळली आहे. माझ्या पासून यथाशक्ती मानवाला लाभलेले ज्ञान, व आनंद बघून त्यांची सेवा झाल्याचा आनंद मला मिळाला. मला लेखकाने किती सुंदर, किमती रूप प्राप्त करून दिल्याची जाणीव होत आहे आणि या नंतरही मी अशीच सेवा करीत राहीन अशी ईच्छा आहे. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे जीवन मी जगले होते..
* पण काय करू माझे अंग आता खिळखिळे होत आहे.माझ्या पाना-पाना वर आता श्याई चे डाग पडलेले आहेत. मला ज्या धाग्यांनी बांधले गेले होते ते आता तुटत आहे. तरी माझ्या कडून तुम्हाला आनंद मिळत असेल. तर तुम्ही मला जपा तर मी तुम्हाला अजूनही ज्ञान व आनंद देण्यास तयार आहे. मी माझ्या अंतापर्यंत प्रयत्न करेन. यातच माझी धन्यता समझेन.
6 Comments. Leave new
It is very nice essay.
Kadak
its very good , the language is also very easy..
Very good essay And language is also very easy.It is a very helpful essay for a the students.
Its a nice essay in easy language its good for school students
Nice i liked it very much