नारी सौभाग्यकरण मंत्र . (Naree Subhagya Mantra)
जी श्रद्धावान नारी स्नानादीने शुद्ध होऊन सूर्योदयापूर्वी । ओम ओम ऱ्ही ओम क्रि र्हीं ओम स्वाहां । “या मंत्राच्या दहा माळा जाप दररोज करते. तिच्या घरात सुख, समृद्धी कायम स्थिर राहते. या मंत्राचा जप शुभ मुहूर्तावर सुरु करावा. दर वर्षी चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रीत वटवृक्षाच्या समिधांनी विधीपूर्वक हवन करून बटू इ. भोजन देऊन संतुष्ट करावे या मंत्राच्या सम्यक अनुष्ठानाने घरात सुख शांती आणि समृद्धी कायम आहाते.
माता नारीचे आदर्श स्वरूप. (Mata Nareeche adrsh roop)
हिंदू धर्म नारीला मातेच्या रुपात अधिक मुल्य देतो. त्याने मातृ स्वरूपात इश्वराची कल्पना केली आहे. हिदुत्व हि एक अशी मानवता आहे जी जगताचे संचालन एका शक्तीच्या आधारे होत आहे. असे मानते. ती शक्ती आद्यशक्ती जगन्माया म्हटली जाते. ती प्रत्यक्ष परमपुरुष परमात्म्याची,परब्रम्हचीच आल्हादिनी शक्ती आहे. त्याचीच सत्ता मात्र आहे. म्हणूनच हिंदू धर्म अनेक बाबतीत जेव्हा जगताचे संचालन बिकट झालेले असते. तेव्हा आद्यशक्तिला तेथे अग्रेसर करूनआणि मातृस्वरूपात तिचा स्वीकार करतो.
तांत्रिकांनी हे सिद्ध करून दाखविले आहे कि मातेच्या रुपात स्त्रीची पूजा करून (अर्थात त्यांचा प्रयोग नग्न स्रीची मातृ भावाने पूजा करण्याचा आहे.) आपल्या जातीय उर्जेला अंतर्मुख केले जाते. त्या मुळे काम विकार नष्ट होउन जीवन शक्ती वरच्या दिशेने वाहण्यास सुरु होते. यावरून लक्षात येते कि जर एखाद्या पुरुषाने स्त्रीला माता समजून तिच्याशी मातृवत संबंध ठेवले तर तिच्या जातीयतेचा प्रश्न त्याच्या साधनेत पूर्णपणे अबाधक होईल. म्हणूनच हंदू धर्म महाकाली आणि जगदंबेच्या पूजेला तेवढेच महत्व देतो कि जेवढे महत्व तो राम, कृष्ण आणि शिव यांच्या उपासनेला, पूजेला देतो.
नारीला मातेचा आदर्श मानले गेलेले आहे कारण नारी जनन,पोषण, रक्षण आणि संहार या चारही क्रियांमध्ये सफल सिद्ध झाली आहे. नारीचे हृद्य कोमल आणि सौम्य असते. याच कारणामुळे ती जगताच्या पालक-मातेच्या स्वरूपात ती स्वीकृत झाली आहे. भारतीय संस्कृतीने स्रीला मातेच्ज्या रुपात स्वीकार करून हि गोष्ट प्रसिध्द केली आहे. कि नारी पुरुश्याच्या कामोपभोगाची सामुग्री नसून वंदनीय आणि पूजनीय आहे. म्हणूनच मनु महाराजांनी म्हटले आहे कि “एक आचार्य दहा उपाध्यायांपेक्षा श्रेष्ठ आहे, एक पिता शंभर आचार्य पेक्षा उत्तम आहे आणि एक माता एक हजार पित्यां पेक्षा श्रेष्ठ आहे”.