स्मृती म्हणते कि मातेचे पद सर्वात श्रेष्ठ आहे, माता कधीही आपल्या अपत्याचे अहित चिंतीत नाही. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती। पुत्र कुपुत्र होऊ शकेल परंतु माता कधीच कुमाता होत नसते. माता हि माताच असते. नारीचे मातृत्व हा करुणामयी जगन्मातेचाच प्रसाद आहे. म्हणून मनुष्याने परमधर्म समजून मातेच्या सेवेत संलग्न राहिलेच पाहिजे. हेच गृहस्थाच्या दोन्ही लोकींच्या सुखाचे कारण आहे. मातेचे स्थान हे खरोखच स्वर्गा पेक्षाही उच्च आहे.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।
अपत्याला नउ महिने गर्भात धारण करणे आणि विविध कष्ट सहन करूनदेखील त्याचे पोषण करणे. या कारणानेच मातेची पदवी सर्वापेक्षा श्रेष्ठ झाली आहे. भू लकी हि गोष्ट प्रसिद्ध आहे कि जेव्हा कोणत्याही व्यक्तीवर आकस्मिक संकट येउन कोसळते तेंव्हा तो ‘ आई$$ ग $$ असे उच्चारण सहजच करतो.
आपदि मातैव शरणम् ।
आपत्ती मध्ये माता शरण होय, आणि समं नास्ति शरीरपोषणम्। माते समान शरीराचा पोषक कोणी नाही.
Who is the Great lady on this earth? Its Mother. She is the real God on this earth. we all have to care for your Mother. take care she is the only lord here. Great lady.