लज्जा : नारीचे भूषण –
असन्तुष्टा व्दिजा नष्टा: सन्तुष्टा एव पार्थिवा: |
सलज्जा गणिका नष्टा लज्जाहीना : कुलस्त्रिय: ||
संतोषहीन ब्राम्हण, संतोषी राजा, लाजवंती वेश्या आणि लज्जाहीन कुलवधू यांचा नाश निश्चित आहे. नारी कडे सर्वात मौल्यवान संपत्ती आहे तिचे सतीत्व, या सतीत्वाचे रक्षणच म्हणजे नारीचे खरे रक्षण होय. म्हणूनच ती बाह्य व्यवहार-सोडूनच घरची राणी बनून राह्ते. स्त्रियांसाठी स्त्रीयोचीत लज्जा सोडून पुरुष्याना नि:संकोच भेटणे, त्यांच्या बरोबर नाटक-सिनेमाला जाणे, खाणे-पिणे आणि नृत्य ई क़रने सर्वात अधिक हानिकारक आहे. आजकाल जे लोक स्त्रियांच्या उद्धारासाठी, स्त्रीजातीवर सहानुभूती व द्या करण्याच्या भावनेने तिला घरातून खेचून बाजारात पुरुश्याच्या बरोबरीने उभी करण्यात आपले कर्तव्य मानतात, ते लोक एकतर त्यांचा भाव शुद्ध असूनही भ्रमात आहेत किंवा जाणूनबुजून आपल्या वासनेला दया-सहानुभूतीचे पांघरून घालून स्त्री-जातीच्या सत्यानाशामध्ये संलग्न आहेत.
स्त्रीमध्ये लज्जा नैसर्गिक आहेच हा दैवीभाव तिच्यात स्वाभाविकच असतो त्यामुळे सतीत्व आणि पतीव्रत्याचे पोषण- संरक्षण होते. म्हणूनच लज्जा स्त्रीचे भूषण म्हटलेले आहे. लज्जेचा परित्याग करून पुरुष्याप्रमाणे सर्वत्र फिरण्यात स्त्रीचा गौरव नाहि. हे एक वैज्ञानीक रहस्य आहे कि ज्या स्त्रीवर पुष्कळशा पुरुष्याची विकारी-दृष्टी पडते तिच्या चारित्र्याची निश्चितच हानी होते. मनुष्याच्या मानसिक भावनांचा विद्युत प्रभाव त्यांच्या शरीरातून निरंतर वाहत असतो. हा प्रवाह शब्द, स्पर्श आणि दृष्टी द्वारे दुसर्यांच्या मनावर आणि शरीरावर परिणाम करतो.
लाज सोडून पुरुष्यामध्ये नि:संकोच हिंडण्या -फिरण्याने पवित्र पतीव्रत्याची हानी होते.कारण या स्थितीत स्त्रीला हजारो पुरुष्याच्या विकृत,कामुक,दुषित दृष्टीला बळी पडावे लागते.
“स्त्रीची कीर्ती स्पटिकाच्या दर्पणा प्रमाणे आहे, जो अत्यंत उज्ज्वल आणि चमकदार असून सुद्धा एका श्वासाने देखील मलीन होऊ लागतो”. : सर वांटेस, यांचे विचार ।
*” सर्वात अधिक सुगंध असलेली स्त्री तीच आहे कि जिचा गंध कोणालाच मिळत नाही”. : प्लैन्टस, यांचे विचार .
*”स्त्री हे एक असे फुल आहे जे छायेतच ( घरातच ) आपला सुगंध पसरविते”. : लेमेनिस, यांचे विचार .
*”श्रेष्ठ सुवासिक फुल लाजाळू आणि चित्ताकर्षक असते” . : वर्ड्स वर्थ, यांचे विचार .
* जी वस्तू जेवढी मौल्यवान आणि प्रिय असते ती तेवढीच अधिक सावधानतेने व सन्मानाने, सुरक्षित ठेवली जाते. स्त्री पुरुषाच्या विषय-विलासाची सामुग्री नसून संपूर्ण ग्रहस्थ-धर्मा मध्ये सहचारिणी आहे. अनेक पुरुश्याची दृष्टी स्त्रीवर पडू नये आणि विपरीत, म्हणजे स्त्रीची दृष्टी अनेक पुरुष्यावर पडू नये या साठीच तिला बाजारात,न हिंडता घरात राहण्याचे विधान आहे.
याचा अर्थ असा नाही की , तिने परंपरेच्या चक्रात गुरफटून राहावे क़पडे-दागिने, मुले-बाळे यांतच मग्न राहावे, डोळे बंद करून जगावे ओझे वाहून नेणारी बाहुली बनावे, नाही. स्त्रीने या अंध: काराकडे नेणार्या मलीन रस्त्यांपासून दूर राहिले पाहिजे आपल्या अंतरातील खजिना साधनेच्या प्रकाशाने शोधावयाचा आहे. मनुष्य जीवन मिळाले आहे तर आपल्या व्यवहारिक कर्तव्याचे पालन करीत-करीत परम कर्तव्य असलेल्या आत्मज्ञांनाची सिद्धी करावयाची आहे. त्यासाठी पातिव्रत्य आवश्यक आहे. त्यांच आधारावर चारीत्र्याची पूर्ण ईमारत उभी आहे. जी स्त्री उच्छ्रुखलेपासून दूर राहून आपल्या गौरवाने गौरवान्वित होते, आपल्या वास्तविक महिमेने महिमामयी होते, तिच्यामुळे हि पृथ्वी देखील पावन होते म्हणून तिने आपले पावित्र्य स्वत: जपले पाहिजे.
* आजकाल सुधारणे च्या नावावर स्त्रियांना बरोबर घेवून हिंडण्या फिरण्याची व हॉटेलात जाऊन एकाच टेबलावर खाण्या-पिण्याची प्रथा वाढत आहे. अशा स्त्री-पुरुषांनी प्रामाणिकपणे आपल्या मनोद्शेचे अवलोकन केले पाहिजे आणि योग्य प्रकारे विचार करून सर्वांनी अशी व्यवस्था केली पाहिजे की ज्यामुळे नारीस भूषण असलेल्या लज्जेचे रक्षण होईल आणि तिचा पतिव्रता धर्म अक्षय टिकून राहील. म्हणूनच स्त्रीयांनसाठी पुरुषलयांमध्ये, बाजारा मध्ये न हिंडता घरातच राहण्याचे विधान आहे.