मदालसा देवी म्हणायच्या : “एकदा जो माझ्या उदरातून बाहेर आला तो जर दुसर्या स्त्रीच्या उदरात गेला. (म्हणजे तो मृत्यू नंतर मोक्ष प्राप्त न होता परत जन्माला येईल ) तर माझ्या गर्भ धारणेला धिक्कार आहे.”
त्या आपल्या मुलांना पाळण्यात झोपविताना त्यांना अध्यात्मिक ज्ञांनाची अंगाईगीते ऎकवीत असत. जसे शुद्धो $सि बुद्धो $सि निरंजनो$सि संसारमायापरिवर्जितो$सि । संसारस्वप्नं त्यज मोहनिद्रां मदालसा वाक्यमुवाच पुत्रम् ॥-
अर्थ : “हे पुत्रा !तू शुद्ध आहेस, तू बुद्ध आहेस, निरंजन आहेस, विश्वाच्या मायेनेरहित आहेस. हा संसार केवळ स्वप्न आहे. ऊठ जागा हो, मोहनिद्रेचा त्याग कर तू स्तच्चिदानंद आत्मा आहेस.” या आर्य महिलेने, या आदर्श मातेने आपल्या सर्व पुत्रांना आत्मज्ञांनाने संपन्न बनवून संसारसागरातून पार करविले.
तेव्हा माता बनायचे असेल तर असे बना. मुलांना आत्मज्ञांनाची अंगाईगीते ऐकवा. घरात देखील त्याच विषयांवर चर्चा करा. सुख-दु:ख आले तरी आत्मज्ञानाच्या नजरेने पहा. या मायेच्या संसाराला कधी अति प्रभावित होवू नका. आपल्या परमात्म्याच्या मस्तीत मस्त राहा.