लॉर्ड बेडन पॉवेल !




Like
Like Love Haha Wow Sad Angry
270411

जन्म २२ फेब्रुवारी १८५७ .. मृत्यू ८ जानेवारी १९४१

बेद्न ओप्वेल ही जगभर पसरलेल्या  ‘बालवीर’ संघटनेचे जनक असून त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मित बेड्न पॉवेल . त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. इ. सन. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण ऑफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अश्या विविध ठिकाणी कामगिरी बजावली.आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोचले. १९०७ साली त्यांनी ; बालवीर’ चळवळ सुरु केली.

थोड्याच दिवसात हि चळवळ अनेक देशांत पसरली.१९१० साली आपली बहिण ओंग्रेस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ हि संघटना स्थापन केली.विवाहा नंतर ह्या संघटनेची जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी-बोड्न- पॉवेल यांनी सांभाळली संघटने च्या स्थापने पासून ६-७ वर्षातच या संघट्नेची पथके बेल्जियम, हॉलण्ड, अमेरिका, भारत, चीन, रशिया राष्ट्रांन मध्ये सुरु झाली. संघनेची पाहणी करण्या करीता. या पती-पत्नी ने सर्व देश्यांना भेटी दिल्या. त्यात भारतालाहि त्यांनी १९२१व १९३७ साली भेट दिली होती.

बाय स्काउट १९१६ साली चेन्नई जवळ अड्यार ला सुरु झाले. १९१७ साली पं. मदनमोहन मालवीय यांनी बॉइज स्काउट चळवळ सुरु केली.१९२१ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या.व त्याचे नाव बायस्काउट ठेवले.१९३८ हिंदुस्थानात स्काउट असोशियन ची स्थापना केली. त्यात हिंदुस्थान स्काउट. बायस्काउट ,गर्ल गाईड हे भाग होते. ७ नोहेंबर १९५० मध्ये एकत्रित होऊन ‘ भारत स्काउट & गाईड ‘ असोशियन हे नाव दिले.

भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनविण्यात सहकार्य करणे हा उद्द्येश होय. ईश्वरा विषयी पूज्य भावना, स्वहितापेक्षा देशहित मोठे, शेजारी व ईतराविषयी सेवाभावाचे बीज रुजावे हा उद्द्येश होय. सर्वजगात बंधुभाव, ऐक्य , व शांतता नांदावी, समान ध्येयाच्या संस्थांशी मित्रत्व राहील हे धोरण स्काउट चे आहे. हे पटवून दिले.दिनांक ८ जानेवारी १९ ४१ रोजी त्यांचे निधन झाले.

lord baden powell Original picture collection:

 

Lord Baden Powell Biography In Marathi, Get Marathi essay on Robert Baden-Powell, full biography and original picture collection.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
270411




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu