जन्म १ ऑगष्ट १९२०. मृत्यू -१९६९ .
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ऑगष्ट १९२० या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात वाटेगाव या खेड्यात मातंग समाजात झाला. आणि अण्णाभाऊ साठे नावाचा क्रांती सूर्य उगवला.त्यांच्या वडिलांचे नाव भाउराव सिद्धोजी साठे व आईचे नाव वालुबाई होते. त्यांना लहान भाऊ शंकर व बहीण जाईबाई.
बारष्याचे दिवशी त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले. संत तुकारामा प्रमाणे हाही तुकाराम मोठा साहित्यिक झाला. साहित्यी क्षेत्रातील चमत्कारी ठरला. अर्थात अन्नाभाउच्या बाल्यावस्थेत कोणी म्हटले असते, कि हा मुलगा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करील, तर असे भाकित ठरविनार्याला वेडेच ठरविले गेले असते. त्याचे कारण म्हणजे,एक तर पददलित जातीकुळी व विलक्षण दैन्यावस्था, रोज बारा वाजताची वेळ कशी भागेल याचीच भ्रांती असायची अन्नाभाऊंची आई विचारी होती. पूर्वी जिजाबाई ने शिवबाला रामायण-महाभारतातील कथा सांगितल्या, तद्वतच वाळूबाईंनी छोट्या तुकारामाला वीर लहुजी वस्ताद, फकीरा, वीर सत्तू , पिराजी यांच्या गोष्टींचे संस्कार केले.
“माझी मैना गावाकड ऱ्हांयली , माझ्या जीवाची होतीया काह्यली ‘ या सारख्या ठसकेबाज लावण्या आणि ‘फकीरा’ ‘वारणेचा वाघ’ ‘ माकडी ची माळ ‘ मास्तर ‘ यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. मातंग समाजात जन्मलेले अण्णाभाऊ अल्प शिक्षित असले तरी त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या समाज मनाचा ठाव घेणार्या आहेत. त्यांच्या अंतर मनाचा तो प्रकट हुंकार आहे. समाज परिवर्तनाचा विचार मांडणारा हा साहित्यिक स्वातंत्र चळवळी च्या जनसागरात गुंतलेला लढाऊ माणूस अण्णांनी आपल्या लेखणीतून उभा केला. ग्रामीण, पददलित, आणि लाचारीचे जिने जगणारी माणसे त्यांनी आपल्या खास शैलीत उभी केली.
फकीरा प्रमाणे मातंग असणारा नायक , एक अजस्त्र ताकदीचा व धैर्याचा महामेरू, भारतीय स्वातंतत्र्य लढ्याच्या रनांगणात दिनद्लितांच्या व उपेक्षितांच्या वतीने लढणारा नायक म्हणून त्यांनी ‘ फकीरात ‘ केला फकीरा हि कादंबरी त्याकाळात फार प्रसिद्ध झालेल्या सर्वोत्कृष्ट ठरल्या.पस्तीस कादंबर्या, तीन नाटके, अकरा लोकनाट्ये,तेरा कथा संग्रह आणि सात चित्रपट कथा लिहिणार्या अण्णाभाऊनि फक्कड लावण्याही लिहिल्या. शाहीर गवानकरांच्या ‘ लालबावटा ‘ कलापथकां द्वारा अनेक तमाशेही केले.जगण्यासाठी लढणार्या माणसांचे चित्रण करणार्या अन्नाभाउंनी “मुंबई नगरी बडीबांका,जशी रावणाची लंका वाजतोय डंका चौहुमुलुखी” अश्या शब्दात मुंबईचे चित्र रेखाटले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ” मार्क्सवाद भाकरीचा प्रश्न सोडवील पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच आणि मला भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे. “या विचाराने अण्णाभाऊ भाराऊन गेले. हा स्वाभिमान त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांतून आपले अस्तित्व दाखवू लागला. अन्नाभाउंनी उभ्या आयुष्यात मुख्यत: दोन गोष्टींचा तिटकारा केला. एक म्हणजे श्रीमंत लोकांकडून होणारे गरीबांचे शोषण आणि अस्पृश्य बांधवामची होणारी धार्मिक, सामाजिक पिळवणूक. अनाभाउंनि या गोष्टीवर आपल्या लेखणीने सतत कोरडे ओढले, प्रहार केले. जनसामांन्यांच्या या लोकशाहिराचे दिनांक १८ जुलै १९६९ रोजी निधन झाले.
Annabhau Sathe the social reformer and activist, get Marathi essay and biography on him. original picture gallery of Annabhau Sathe.
2 Comments. Leave new
Get Marathi Essay Collection Here
https://www.marathi-unlimited.in/download-marathi-dvd-movies/
amsuryawanshi46@gmail.com