महावीर स्वामी!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Bhagwan Mahaveerविश्व कल्याणकारी आत्म्यांनी या भारत भूमी वर जन्म घेऊन आपले अवतार कार्य पूर्ण केले. अश्या पुरषोत्तमात श्री महावीर स्वामींचे स्थान हे फार वरच्या क्रमांकावर लागते. ख्रिस्ती सनापूर्वी ५२७ वर्षी एका वैभवशाली राज घराण्यात महावीरांचा जन्म झाला. राज वैभव आणि भौतिक सुखाचा त्याग करून मानवतेत त्यांनी सारे जीवन व्यतीत केले. बारा वर्षे खडतर तपस्या केली.अत्यंत खडतर शारीरिक यातना सहन केल्यां त्या नंतर त्याना आत्मज्ञान मिळाले. त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. जैन धर्माची शिकवण दिली.जीन म्हणजे इंद्रिय दमन करणारा त्यावरून ‘जैन’ हे नाव रूढ झाले.

महावीरांचे लहाण पनचे नाव वर्धमान होते.वैशाली गणराज्यात बिहार राज्यात कुंडग्रामी १६ एप्रिल ख्रिस्ती सना पूर्वी ५२७ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे क्षत्रिय जनगन तंत्राचे प्रमुख होते. त्रिशीला हे त्यांच्या मातेचे नाव लिच्छवी गणराज्य प्रमुखाची ती बहीन वयाच्या पाचव्या वर्षी शिक्षणासाठी त्याला गुरुकुलात पाठविण्यात आले. तो संस्कृत पंडित बनला. वेदशास्त्र निपुण झाला. राजकन्या यशोधराशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तिच्या पासून एक मुलगीही झाली. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी राजप्रासाद सोडला.अध्यात्मिक ज्ञान संपाद्ना साठी बारा वर्षे कठोर तपस्या कली. एकदा समाधी अवस्थेत त्याना त्यांच्या कडक तपश्चर्येने कैवल्याचे ज्ञान झाले. त्याच वेळी ते पवित्र झाले. एकदा वृक्षाखाली बसले असताना मनाची एकाग्रता व विशुद्धता यामुळें मनोविग्रह साधतो, याच अवस्थेत सत्य, सत्याचरण, आणि प्रज्ञानबोध होतो. या त्यांच्या इंद्रियदमनामुळें लोक त्यांना महावीर म्हणू लागले.

द्रुष्ट रुढींचे प्राबल्य माजले म्हणजे खरी धर्माची शिकवण विसरली जाते. धर्माच्या नावाने स्वार्थी, पुरोहित रुढींचे स्तोम वाढवितात. अज्ञानी , धर्मभोले लोक त्याला बळी पडतात. महावीरांच्या काळी अशीच स्री वर्गाची दयनीय अवस्था केवळ, गैरसमज व रुढींमुळे झालेली होती स्रियांना मान प्रतिष्ठा तर राहु द्याच पण माणुसकीची वागणुक ही दिली जात नव्हती. दासी प्रथा समाजात बोकाळलेली होती. या दासींना पशुप्रमाने जीवन जगावे लागत असे. आणि मग अश्या दासींना कोणी जवळ सुद्धा करीत नसत. त्यांच्या हातचे अन्न कोणी खात नव्हते, त्याना शिवत देखील नव्हते. महावीरांचे करुणामय हृद्य हे सर्व पाहून वेदनांनी भरून येई. त्यांनी लोकांना दासी कडे पाहण्याचा तुच्छ दृष्टीकोण सोडून देण्यास शिकविले. उच्च-निच्च, भेदभाव, शिवाशिवी,ह्या खुळ्या कल्पनांचा त्याग करावयास सांगितले. महावीरांच्या कृतीने अनेकांचे डोळे उघडले.त्यांना नवी दृष्टी लाभली. सद्धर्माचा प्रकाश दिसला;! ” धर्मही उपदेश करण्याची वस्तू नसून आचरणात आणण्याची गोष्ट आहे;! ” असा उपदेश त्यांनी लोकांना दिला.

ज्याने स्व:त ला जिंकले तो जगहि जिंकतो. वासनामुक्त जीवन,अहिंसा धर्म, या व्रताने कोणत्याही प्राण्याला दु;ख देता येत नाही. या सर्व शिकवणी त्यांनी तीस वर्ष दिल्यात, ‘ऋषभदेव’ हा पहिला जैन तीर्थकर जैन धर्माचा संस्थापक मानतात. ‘महावीर’ हा चोविसावा तीर्थकर होता. त्यांनी जैन धर्म संघटीत केला. मगधाचा राजा बिंबीसार त्यांचा चाहता होता. ख्रिस्ती सनापूर्वी ५९९ साली, तो निर्वाणावस्थेत पोचला.

Life span of bhagwan mahavir, Life span of bhagwan mahavir. … The concise division of the life span of bhagwan mahavir. essay in Marathi.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu