दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह, त्याचे वय ३३ आहे . याने आज तिहार कारागृहात आत्महत्या केली. दिल्ली रेप कांडातील राम सिंह हा प्रमुख आरोपी होता. त्याचा मृतूची मागणी झाली होती, त्या फासी आधीच त्याने स्वतःला गळफास लावून आपले जीवन संपून टाकले. आज पहाटे त्याने शर्टच्या साह्याने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. राम सिंहच्या आत्महत्येमुळे या खटल्याला वेगळे वळण लागले आहे. मानसिक तणावाखाली असलेला राम सिंह आत्महत्येचा विचार करू शकतो, ही शक्यता गृहीत धरून त्याच्यावर विशेष लक्ष देण्यात येत होते, मात्र त्याने गळफास घेतल्याने कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र पहाटेच्या सुमारास कुणाचेच लक्ष त्यावर का गेले नाही मात्र विचित्र बाब आहे. याच वरून तिहार कारागृहाची दुर्दशा आणि सुरक्षा कितपत आहे हे कळून येते . राम सिंहच्या मृत्यू मागे काही कट आहे कि त्याने स्वःतलाच हे मात्र अजून कळले नाही .
कारागृहातील कोठडीत राम सिंह एकटा नव्हता. तो एकटा नसूनही हे कसे घडले यावर प्रश्नचिन्ह आहे. तेथे इतर कैदीही होते, तसेच सुरक्षारक्षकही होता, पण त्यांना राम सिंहच्या कृत्याविषयीच काहीच कळाले नाही. पहाटे पाचच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याची माहिती काराहातील अधिकाऱ्यांनी दिली. आत्महत्येचा प्रकार लक्षात आल्यानंतर राम सिंहला तातडीने कारागृहातील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.