लोकमान्य तिळक !
बाळ गंगाधरपंत टिळक हे कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखलगाव येथे वडीलोपार्जीत शेती सांभाळत राहात होते पण शेतीवर चरितार्थ चालविणे अवघड झाले तेव्हां त्यांनी दरमहा पाच रुपये पगारावर शिक्षकाची नोकरी स्वीकारली संस्कृत आणि गणित या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.चिखलगाव येथेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा २३ जुलै १८५६ मध्ये जन्म झाला. त्यांच्या मातेचे नाव पार्वतीबाई होते. मुळनाव केशव ठेवले होते. तरी सर्वजण बाळ असेच म्हणत.तेच नाव पुढे कायम झाले. कुशाग्र बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती असल्याने बाळला गंगाधरपंतांनी संस्कृत आणि गणित या विषयांत तरबेज केले. बाळने हि हे विषय आवडीने अभ्यासले. यातूनच संस्कृत ग्रंथाचे वाचन करणे,अवघड गणिते सहजपणे सोडविणे याचा बाळला नादच लागला.
प्राथमिक शिक्षणा नंतर बाळ पुण्यात आले. आपल्या हुश्यारीने बाळने येथील शिक्षकांचे प्रेम संपादन केले. शालेय जीवनापासूनच त्यांच्यात सत्यप्रीयता,स्पष्टवक्तेपणा आणि अन्याअयाचा प्रतिकार करण्याची वृत्ती प्रकट होत होती. १८७२ मध्ये दहावी उतीर्ण झाल्यावर डेक्कन कॉलेजां तून त्यांनी १८७६ मध्ये बी.ए. हि पदवी परीक्षा उतीर्ण केली. १८७९ मध्ये ते एल.एल.बी.झाले. डेक्कन कोलेजात असताना त्यांचा विष्णूशास्त्री चिपळुनकर आणि गोपाळराव आगरकर यांच्याशी परिचय झाला. ते तिघेही देशभक्त आणि स्वातंत्र्यप्रेमी होते.त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. या परकीय सत्तेखाली पारतंत्र्यात जगणार्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य प्रेम निर्माण केले पाहिजे.या वर तिघांचे एकमत झाले. अगदी बालपणापासूनच मुलांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम निर्माण केले पाहिजे असे ठरवून त्यांनी १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
बाळ लोकमान्य टिळकांनी तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आणि गोपाळराव आगरकरांनी सरकारी नोकरी आणि मोठा पगार यानकडे न वळता शिक्षकी पेशा स्वीकारला. या शिक्षकी पेशात टिळकांच्या संस्कृत आणि गणित या विषयांतील आवडीचा चांगला उपयोग झाला. या तिनहि देश भक्तांच्या मनातील देशभक्तीची भावना अत्यंत तीव्र होती. त्यामुळे केवळ शालेय विद्यार्थ्यापुरते शिक्षकाचे काम मर्यादित न ठेवता सर्व समाजात आपले विचार पोचवावे. म्हणून त्यांनी ‘ केसरी ‘व ‘मराठा’ हि वृत्त पत्रे सुरु केली. लोकांच्या मनात या वृत्त पत्रांतील लेखनाने स्वदेशा विषयीची निष्ठा वाढवावी, व परकियांच्या सत्तेतून मुक्तता व्हावी, भारतीयांवर होणार्या अन्यायाला वाचा फुटावी ; असा त्या वृत्तपत्रा मागील हेतू होता.
‘केसरी’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणार्या लेखनात १८८२ मध्ये एकदा कोल्हापूर संस्थानातील अन्यायाला वाचा फोडणारा मजकूर प्रसिद्ध झाला. आणि त्यावरून प्रकरण चिघळले.त्यांच्यावर खटला झाला. टिळक, आगरकरांना १०१ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगाच्या बाहेर पडल्यावर टिळक-आगरकरांच्या पुढाकाराने १८८५ साली पुण्यात ‘फर्ग्युसन’ कॉलेज सुरु झाले. तिथे हे दोघे प्राध्यापकाचे काम करू लागले. त्यावेळीही त्यांचे वृत्तपत्राचे काम चालूच होते.पुढे टिळकांचे कॉलेजमधील सहकार्यांशी मतभेद झाले.आणि टिळकांनी केसरी पत्र स्वत:चालविण्यास घेऊन कोलेज्शी असलेला सम्बंध तोडला. नंतर टिळक स्वतंत्रपणे, सामाजिक व राजकीय विषयांवरची आपली मते प्रभावीपणे मांडू लागले. टिळकांच्या निर्भीड, उग्र, सत्य लेखनाने ‘केसरी’ लोकप्रिय होऊ लागला.
‘केसरी’ मधील लेख वाचून लोकांच्या मनात ब्रिटीश राजवटी बद्दलचां असंतोष वाढू लागला. सरकारला ‘ केसरी’ आणि टिळक यांचा धाक निर्माण होऊ लागला.
१८९६ — ९७ मध्ये पुण्यात प्लेगने थैमान घातले. त्या पेक्षाही इंग्रज सरकारच्या अधिकारांनी यावेळी केलेल्या अन्यायांनी कळस गाठला. त्याचा अखेर शेवटी एका इंग्रज अधिकार्याच्या खुनात झाला. या सर्व प्रकारांबद्दल टिळकांनी जे लेखन केले त्याचे निमित्त करून सरकारने संधी साधली. आणि टिळकांना तुरुंगवासात पाठविले. या सरकारच्या कृतीचा परिणाम उलटा होवून टिळकांना अधिकच लोकप्रीयता मिळाली. टिळक ‘लोकमान्य’ नेता झाले. “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे” आणि “तो मी मिळविणारच, अशी त्यांची धारणा होती.
लोकमान्य हे ब्रिटीश सरकारबद्दल लकांच्या मनात असंतोष निर्माण करणारे नेते म्हणून एकीकडे कार्य करीत होते; त्याच वेळी त्यांचा आवडत्या विषयांचा अभ्यासही सुरूच होता.त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर,सामाजिक परिस्थितीवर आणि प्रासंगिक घटनांवर ‘केसरी’ तून लेखन करतानाही “आर्यांचे वस्तीस्थान” ओरायन” “शास्त्रीय पंचांग” “गीतारहस्य” असे ग्रंथ लिहून आपल्या अभ्यासाचा परिचय घडविला. समाजातल्या सर्वांना एकत्रित आणून व्याख्यांनान द्वारे मतप्रचार करण्यासाठी त्यांनी ” गणेशोत्सव ” श्री शिवछत्रपतींच्या जयंतीचा उत्सव असे नवे उपक्रम सुरु केले.
लोकमान्यांची लोकप्रीयता वाढतच हती. राष्ट्रीय नेता म्हणून त्यांचा उल्लेख होत होता, त्यामुळे सरकार बेचैन होत होते.टिळकांना लोकांपासून दूर ठेवण्याची संधी सरकार शोधत असायचे.लोकमान्य अत्यंत कडक शब्दात सरकारी धोरणांवर निर्भीडपणे टीका करीत असत. १२ मे १९०८ च्या ‘ केसरीत’ त्यांनी लिहिलेल्या ‘ देशाचे दूर्दैव ‘ या लेखाबद्दल सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. सहा वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात भारताबाहेर पाठविण्यात आले. पण तरीही टिळकांनी तेथेही चिंता न करता, शांत मनाने ‘गीतारहस्य’ सारखा मोठा ग्रंथ लिहिण्याचे धाडस केले. या काळातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पण टिळकांनी ते दु:ख हि शांतपणे पचविले. भारतीयांच्या मनात इंग्रज सरकार विरुद्ध नेहमीच असंतोष निर्माण करीत असत त्यामुळे त्यांना ‘ असंतोषाचे जनक’ असे संबोधण्यात येत असे. या त्यांच्या अनेक कार्यांनी त्यांनी सरकारला कधी लेखणीद्वारे तर कधी व्याख्यानातून हादरवून सोडलेले होते. पण नंतर लोकमान्य १ ऑगष्ट १९२० मध्ये ते निधन पावले. त्यांना आपणा सर्वभारतीयांचा कोटी कोटी प्रणाम !
Original Picture Collection of Bal Gangadhar Tilak
Bal Gangadhar Tilak essay in Marathi, Bal Gangadhar Tilak essay in Marathi, students essay list. get full biography of Bal Gangadhar Tilak .
2 Comments. Leave new
Useful information👍👍👍👌
चिखलगाव येथेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा २३ जुलै १८५६ मध्ये जन्म झाला आणि वडीलोपार्जीत शेती, हि चुकीची माहिती आहे