जन्म – १७२५ — मृत्यू १३ ऑगष्ट १७९५
अहिल्या बाई यांचा जन्म बीड जिल्ह्यात चोंढे नावाच्या लहानश्या गावात १७२५ या साली झाला.या गावचे पाटील माणकोजी शिंदे हे त्यांचे वडील. अत्यंत गरीब घराण्यात जन्मलेली अहिल्या नाकी डोली तरतरीत व तेजस्वी चेहर्याची होती.घरातील साध्या राहणी बरोबर धर्मनिष्ठेचा, ईश्वरा वरील श्रद्धेचा वारसा अहिल्याबाईस लाभला होता. १७३३ साली वयाच्या आठव्या वर्षी अहिल्या खंडेराव होळकरांशी विवाहबद्ध झाल्या. मल्हारराव होळकर हे इंदूरच्या घराण्याचे संस्थापक व अहिल्या बाईचे सासरे ते मुळचे धनगर आणि होळ गावचे रहिवासी. होळ हे गाव पुण्या पासून ४० मैलावर आहे मल्हाररावक़नचे आधीचे आडनाव वीरकर होते. पण होळ येथे राहणारे म्हणून होळकर झाले. ते तीन वर्षाचे असतांना त्यांचे वडील वारले घरच्या भांडणाला कंटाळून त्याच्या आईने होल हे गाव सोडले. आणि ती मल्हार सह आपल्या भावा कडे राहू लागली.
बाजीराव पेशव्याने मल्हाररावांचे शौर्य व पराक्रम पाहून त्यांना आपला सरदार बनविले. रघुनाथरावांच्या उत्तरे कडील पहिल्या स्वारीत मल्हाररावांनी महत्वाची कामगिरी केली. तेव्हा बाजीरावने माळवा प्रांताची जहांगिरी मल्हाररावांना दिली. मल्हार राव अश्या अर्थाने राजा झाला. अश्या एका राज्याच्या सरदार मल्हारराव होळकरांच्या घरात अहिल्या बाई ने सून म्हणून प्रवेश केले. वयाच्या आठव्या वर्षी माणकोजी शिंद्यांची अहिल्या, होळकरांची गृहलक्ष्मी झाली. सन १७४५ मध्ये अहिल्याबाई पुत्रवती झाल्या. मुलाचे नाव मालोराव असे ठेवण्यात आले. त्यानंतर तीन वर्षाने त्यांनी एका मुलीस जन्म दिला. मुक्ताबाई नाव ठेवले.
मल्हारराव व त्यांचे भाऊ खंडेराव जेव्हा मोहिमेवर जात तेव्हा अहिल्याबाई राज्यकारभाराकडे लक्ष देवून प्रजा पालनाची जबाबदारी स्व:त वर घ्यावी लागे. ती जबाबदारी अहिल्याबाई आपल्या बुद्धीमत्तेने व चातुर्याने चांगल्या प्रकारे पार पाडू लागली. त्यामुळे मल्हाररावांचा आपल्या मुलापेक्षाही तिच्या वर जास्त विश्वास बसला. कधी कधी तती सैन्याबरोबर सुद्धा जाई. घोड्यावर बसने. शस्त्रांचा योग्य उपयोग करणे, याच बरोबर लढांईचे डावपेच हि ती शिकली.
रघुनाथरावांच्या (पेशव्यांच्या) उत्तरेकडील जाटावरील पहिल्या स्वारीत मल्हाररावाने खंडेराव व अहिल्या बाईस हि आपल्या बरोबर घेतले होते. मराठ्यांची फौज खंडणी करीत करीत पुढे चालली होती. कुम्भेरिच्या सुरजमल जाताला रघुनाथराव पेशव्याने एक कोटी रुपये खंडणी मागितली ती देण्याचे नाकारून सुरजमल जाटाने लढाई ची तयारी केली. तेव्हा मराठ्यांच्या सैन्न्याने कुम्भेरिच्या किल्ल्यास वेढा घातला. लढाईला तोंड देऊ लागले. दोन्ही बाजूंच्या तोफ़ाव बंदुका लाःल्या खंडेराव ‘घुटी’ ची सवय असल्यामुळे. रनांगणावरही तो बेहोष अवस्थे मध्ये असायचा. त्या दिवशी घुटी चढवून मोर्च्याच्या जागी जात असताना जाटाच्या तोफेतून सुटलेली एक गोळी लागून तो रनांगनावर ठार झाला. खंडेरावाच्या निधनाने मल्हाररावांची म्हातारपणची काठी गळून पडली. आणि अहिल्या बाईंचे सौभाग्यचं लोपले.
पती युद्धात मारल्या गेल्या नंतर सती जाणार्या अहिल्येस सासर्यांनी थोपविले.राज्यकारभाराचे धडे दिले. आणि स्वत:च्या निधना अगोदर राज्य त्यांच्या हाती सोपविले. अति दक्षतेने अहिल्या बाईने पुढे २८ वर्षे राज्य कारभार चालविला. दरबारात जातीने बसवून अनेक कामे त्या हाता वेगळी करीत. शत्रू देखील त्यांच्या बद्दल आदर बाळगीत असत. भ्रष्ट झालेल्या मंदिरांची पुर्न्र बांधनी, जीर्णोद्धार, देवतांची प्रतिष्ठापणा, घाट -रस्ते, धर्मशाळा बांधणे, अन्न छत्रे चालविणे या लोकोपयोगी कामा मुले भारतात व महाराष्ट्रात त्यांचे नाव अजरामर झाले आहे. अहिल्याबाई आचरणाने अत्यंत पवित्र स्वभावाने स्वाभिमानी, राजकारणात दक्ष, व धर्म कारणात सर्वस्व दानी होत्या. ऎतिहासाथि त्यांची बरोबरी फार थोड्या स्त्रिया करू शकतात.त्यांनी सोरटी-सोमनाथ, काशी-विश्वनाथ अश्या भ्रष्ट मंदिरांची पुनर निर्मिती व देवताची प्राण प्रतिष्ठा केली. पेशवे तर अहिल्या देवींना मान देतच परंतु टिपू व निजाम यान सारखे शत्रू देखील त्यांना मान देत असत.
अश्या या व्यवहारदक्ष, प्रजाहित तत्पर, राजकारणी, उदार, धर्मशीलदेवी अहिल्याबाईने श्रावण वद्य चतुर्दशी शके १७१७ दिनांक १३-८-१७९५ रोजी ‘नामस्मरणाचे’ घोषात देहावसान झाले. पुण्यश्लोक मातोश्री वात्सल्याने जोपासलेली होळकरशाही पोरकी झाली. अहिल्याबाईचे चरित्र अलौकिक आहे. स्त्री असूनही तिच्यात अहंकाराची भावना मुळीच नव्हती. विलक्षणधर्म वेडा बरोबरच तिच्या परधर्म सहिष्णुता होती. पराकाष्टेचा धर्मभोळेपणा असूनही आपल्या प्रजेच्या कल्याणा खेरीज दुसरे विचार मनाला शुवू दिले नाही. तीने अनियंत्रित अधिकाराचा उपयोग फारच दक्षतेने व काळजी पूर्वक केला. या कामी तीची नम्रवृत्ती कायम होती. आपल्या सद्सद बुद्धीचे आदेश तिने कसोसीने पाळले. स्व:त चे आचरण अत्यंत निर्दोष ठेवूनही ती दुसर्याच्या दोषाबद्द्ल व मनाच्या दुर्बलतेबद्दल क्षमा वृत्तीच धारण करी.
Ahilya Bai Holkar essay in Marathi, Maharani Ahilya Bai Holkar , was the Holkar Queen of the Maratha ruled Malwa kingdom, India.
2 Comments. Leave new
Very nice
nice