बस नदीत कोसळली ३४ जण ठार.
Like
Like Love Haha Wow Sad Angry

34 killed in khed bas incident

आज पहाटेची घडलेली हि दुर्घटना. मुंबईहून खेडकडे निघालेली हि बस नदीत पडून ३४ लोकांना जल समाधी मिळाली. पुलाच्या उजव्या बाजूचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली. पहाटेच्या गाढ निद्रेत असणाऱ्या बेसावध प्रवाशांना सावध होण्याची संधीही मिळाली नाही. मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणा नाक्याजवळ ही दुर्घटना घडलीय. प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस जगबुडी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ३४ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत. मृत्यूची संख्या अधिक वाढण्याची अशा आहे. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय. मुंबईहून खेडकडे निघालेली महाकाली ट्रॅव्हल्सची बस जगबुडी नदीत कोसळली आणि एकच आकांत झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस १५० फूट उंचीवरून खाली नदीत कोसळली. आता दरम्यान क्रेनच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: