संपूर्ण भारतात बालस्वास्थ्य हि योजना राबवली जाते. मागासवर्गीय भागात तर या योजनांवर बराच पैसा खर्च केला जातो. मात्र भारत अजूनही कुपोषण सारख्या बाबींपासून बाहेर निघाला नाही. पालघरमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या योजनेचं उद्घाटन केलं. या योजनेमागे भारतातील कुपोषणाचा प्रमाण कमी करण्याचा पर्यंत केला जातो. उद्घाटना दरम्यान त्यांनी म्हटले की या योजनेमुळे 1 लाख 46 हजार अंगणवाडी केंद्रातल्या 77 लाख 52 हजार बालकांना याचा फायदा होणार आहे. आणि महाराष्ट्र राज्यातर्फे होत असलेल्या कार्यक्रमांतर्गत १ ते 18 वयोगटातल्या मुलांना आरोग्य सुविधांचा फायदा होणार आहे. तसेच त्या म्हणाल्या की लवकरच सरकार अन्नसुरक्षा विधेयक आणत आहे.
Source : Marathi Unlimited.