Chana Roll, Chana Dish :
This is type of chaat. If you are a chaat lover then must try this recipe. It is very delicious and nutritious too. Spices used in this recipe enhance it’s taste. It contains the dry fruits too.
साहित्य : एक वाटी हिरवे चणे वाफवून घ्यावे. एक वाटी हिरवे साधे चणे ( हिरवे पण वाफवलेले नकोत ) ७ ते ८ काजू तुकडे, ७ ते ८ किसमिस, १/२ वाटी ब्रेड चुरा, एक चमच अनार दाणे, एक छोटा चमच मिरची पावडर थोडी हळद पावडर, १/२ चमचा गरम मसाला, चुटकी भर हिरवा रंग, चवी नुसार मीठ, तेल.
कृती : दोन्ही प्रकारच चणे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे, वेगवेगळे ठेवावे. ब्रेड चुरा, अनार दाणे, मसाला मीठ, मिरची पावडर, व हिरवा रंग घालून बिन शिजलेल्या चण्याच्या मिश्रणात एकत्रित करावे, त्याचे रोल तयार करावे. ( मात्र त्या रोलच्या आंत एक काजू पीस, किसमिस, व शिजलेल्या चण्याचे मिश्रण ( त्यात प्रथम किंचित मीठ घालावे ) भरावे व नंतर ते रोल गरम नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून सर्व बाजुने तळावे.
Source : Marathi Unlimited.