राज ठाकरे यांच्या दौऱ्यातील पहिलं भाषण झाले.
आज कोल्हापुरातल्या गांधी मैदानात राज ठाकरे यांच्या दौऱ्यातील पहिलं भाषण झाले . या भाषणात त्यांनी वेगवेगळया विषयावर चर्चा केली व ठणकावून सांगितले कि माझा दौरा हा अवघा महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच आहे.या भाषणात त्यांनी शिवसेनेलाही टोला लगावून म्हटले कि आपण स्वबळावर लढणार असून मला कुठल्याही युतीची गरज नाही. एकत्र येण्याची भाषा अशी वर्तमानपत्रात छापून केली जाते का? असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेला टोला लगावला.
मराठी मतं केवळ माझ्यामुळेच फुटतात का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. माझा हा दौरा उभा महाराष्ट्र काबीज करण्यासाठी असल्याची राज गर्जना राज ठाकरेंनी या प्रसंगी केली. तसेच त्यांनी याच बरोबर परप्रांतीयावरही हल्ला चढवला व सरकारला ठणकावून सांगितले कि महाराष्ट्रात मराठी माणसांनाच नोकरीमध्ये प्राधान्य दिले पाहिजे. हिंदी आणि उर्दू भाषांमधून परीक्षा घेण्याच्या सरकारी जीआरचा दाखला देत राज ठाकरेंनी मराठी माणसाची गळचेपी होत असल्याचं म्हटल.
राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शेलीप्रमाणे या वेळी हि नेत्यांची नक्कल करत भाषणामध्ये रंग उडवून म्हटले कि राहुल गांधी टेंपो धुवत असल्याप्रमाणे हातवारे करतात , तर मनमोहन सिंग चावीवर चालत असल्यासारखेच वाटतात.जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर सतत असणाऱ्या आश्चर्याच्या भावांबद्दल त्यांची खिल्ली उडवली. अजित पवारांची नक्कल करत आपल्याला जमिनीतलं काय कळतं यावर राज ठाकरे बोलले. आणि राज ठाकरे इतक्यातच थांबले नाही तर त्यांनी , गृहमंत्री आर आर पाटील यांना जाहीर धमकी देत पुन्हा आमची शाखा निर्माण होताना कार्यकर्त्यांना जर आडवलंत, तर तिथल्या तिथे गाडून टाकू असा गंभीर इशारा दिला. आमच्या शाखा, कार्यालये निर्माण करताना आडवे याल, त्यांच्या घरच्यांनाही धमक्या जातील, हे याद राखा असा सज्जड दमच राज ठाकरेंनी गृहमंत्री आर आर पाटील यांना दिला.
Source : Marathi Unlimited.