राज साहेबांचा सोलापूर दौरा काही गाजतच आहे, सोलापूर येथे होत असलेल्या मोर्चाला तुफान गर्दी बघावयास मिळणार असे चित्र आहे. `महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आध्यक्ष राज ठाकरे (MNS party leader Raj Thakarey) यांच्या राज्यव्यापी दौ-याचा दुसरा टप्पा सुरू झालाय आणि काल ते सोलापूरमध्ये दाखल झाले. सायंकाळी नॉर्थ कोर्ट मैदानात त्यांची जाहीर सभा होते आहे. राज ठाकरें यांच्या सोलापूरच्या सभेला तुफान गर्दी बघावयास मिळेल अशी सर्वांचीच अशा आहे. राज साहेबांच्या सभेस तरुणांची गर्दी हि नेहमीचा जास्त असते, राज्यव्यापी दौऱ्यातील ही त्यांची तिसरी जाहीर सभा सोलापूर येथे आहे. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर येथील सभेत त्यांनी राष्ट्रवादीचेचे नेते, मंत्री अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील ( Jayant Patil )आणि आर आर पाटील (R.R. Patil ) यांच्यावेर कडाडून टीकेचे वार केले होते. आता सोलापूर सभेमध्ये राज कोणाला निशाण्यावर साधतात ते भघायाचे आहे.
Source : Marathi Unlimited.