What is the use of sweet neem leaves
आरोग्य दायी – गोड्निंब
गोड निंबच्या पानांचा वापर प्रामुख्याने कढीला सुगंधित करून विशिष्ठ स्वाद प्राप्त करण्यासाठी करतात. म्हणून याला कढीनिंब किंवा कढीपत्ता म्हणतात. पण कढी, आमटी, भजी ईत्यादी अन्न पदार्थातील उपयोगा साठी ह्या वनस्पतीचा ओषध रूपानेही उपयोग होऊ शकतो या सदाबहार वनस्पतीत आरोग्य वर्धक जीवनसत्वे, खनिजे, आम्ले तेल ईत्यादी चा भरपूर साठा असतो.
हे झाड सर्वांच्या परिचयातील आहे. हे घरोघरी, खेडेगावं, शहर, बाग-बगीचे आणि रानावनातही सर्वत्र आढळते. हे झाड घरा भोवतीच्या वातावरनातील -प्रदूषण नष्ट करून प्राणवायू युक्त स्वच्छ हवेचा पुरवठा करतो. हे सदाबहार हिरवेच असते. ह्यात जीवनसत्व अ (व्हीट्यमीन -ए) भरपूर प्रमाणात आहे. साधारणत: माणसाला दररोज ५००० आय, यु ईतक्या जीवनसत्व-अ ची गरज आहे. तर फक्त १०० ग्राम गोद्निंब पानातून सुमारे ११,५०० आय , यु ईतके हे सत्व सहज उपलब्ध होऊ शकते. शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती आणि डोळ्यांचे आरोग्य ह्या साठी जीवनसत्व अ ची नितांत गरज आहे. ह्यातील जीवनसत्व क, ची तर कमालच आहे, सर्वसाधारण माणसाला दररोज ७५ मीलि ग्र्यम क ची गरज आहे. तसेच गर्भवति,व बाळंतीन महिलेला रोजची १२५ मिली ग्र्याम ची गरज असते. १०० ग्र्याम गोनिंब पानातून सुमारे २१५ मिली ईतके हे जीवनसत्व उपलब्ध होऊ शकते. व्हीट्यमीन सी, व क्यल्शिअम यांचा भरपूर साठा दंत व अस्थि ना फारच लाभदायक आहे. अरात दात व हाडे यांच्या मजबुती साठी या दोन्हीचा पुरवठा उत्तम ठरतो. गोडनिम्बातील फास्फरस मेंदूच्या आरोग्याला पोषक आहे. मेंदूची कार्य शमता वाढून स्मरण शकी वाढवण्यात मदत करते.
गोड्निंबाच्या पानात भरपूर जीवनसत्वे (व्हिटामिन्स), खनिजे, अम्ले, तैल ईत्यादिं चा यात सुंदर समन्वय झाल्यामुळे हे एक प्रकारचे हलके (tonic) समजण्यास काहीच हरकत नाही.. या पानातील सत्वे पाचक आहेत. भजी, वडे हे पदार्थ पचायला जड जातात तेंव्हा त्यातून या पाचक पानांमुळे पचण्यास हलके होतात. गोड निंबाच्या ताज्या पानांचा एक,दोन चमचे रस तेवढाच लिंबाचा रस आणि चवी पुरती साखर याचे मिश्रण घेतल्याने मळमळ व उल्टी (ओमेटीन) चा त्रास थांबतो. लहान मुलांच्या हाडाची वाढ बरोबर होत नसल्यास गोडनिंबाच्या पानांचा कुठल्याही प्रकारे अधिकाअधिक सेवन करावे. किंवा अंगावरील दुध घेणारे बालक असल्यास मातेने सेवन केल्यास दुधातून बाळाला त्यातील सत्वे मिळू शकतात. मातेच्या दुधात वाढ होई. अर्थात बाळाच्या दंत व अस्थीत उत्तम बळकटी येईल. डोळ्यांच्या अनेक विकारांवर जसे डोळे येणे, खाजवणे ई. ह्या पानांतील व्हिटामिन उत्तम गुणकारी ठरते. या पानांचा रस काढून एक थेंब टाकावा दृष्टी तेज होण्यास मदत होते. हगवण, अतिसार, आव, पोटदुखी यावर पानांचा रस काढून २, ३ चमचे व तेवढाच मध घालून चाटण करावे. किंवा कच्ची कोवळी पाने चावून खावी. किंवा पाने कोमट तव्यावर भाजून पावडर करून मधात चाटण कराव. हे लोह रक्तवर्धक, व रक्त शोधकही आहेत. या पानांच्या अधिक सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून त्याचे शुद्धीकरण होण्याशी मदत होते. मुख रोग तोंडातून दुर्गंधी,हिरड्यातून पु वाहने, या विकारात गोडनिंबाची ८, १० पाने तोंडात चघळून थुंकत जावी. गिळू नये. वारंवार असे करीत राहिल्यास मुख रोग दूर होऊ शकतो. तळपाय किंवा टाचेला भेगा पडल्या असल्यास या पानाना वाटून त्याची चटणी रात्री झोपण्या पूर्वी भेगांत भरावी अन त्यावर कापडाची पट्टी बांधून ठेवावी. गोडनिंबाची फळे लहान व काळी असतात. ती टाकावू किंवा फ़ेकाउ नाहीत.त्यातही गुणधर्म आहेत. त्यात विशिष्ट तैल असून ती चर्म रोगावर लाभदायक ठरतात. म्हणून खाज, खरुज ई. या फळांचा रस काढून दोन चंमचे रस त्यात तेवढाच लिंबाचा रस हे मिश्रण तयार करावे व खरजे वर दिवसातून तीन ते चार वेळा लावावे. या झाडांच्या मुळाचां काढा पोटदुखी वर देत राहिल्यास लाभ अवश्य होतो. याच्या लाकडांतही अनेक अमले, व तैल असल्याने ते अधिक टिकाऊ असते. असा हा गोडनिंब फक्त भजी, भाजीलाच उपयुक्त आहे असे समजू नये. याशिवाय यांच्यातील भरपूर जीवनसत्वे, खनिजे, अम्लेव तैल याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी या अल्पमोली पण बहुगुणी वनस्पती औषधीचे सेवन करून आपले आरोग्य चांगले ठेवावे.
Source : Marathi Unlimited.