डोंबिवली ते ठाणे फक्त २० मिनटात
डोंबिवली ते ठाणे मार्गाकरिता 200 कोटींच्या प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात डोंबिवली-ठाण्यामध्ये पूल बांधण्यात येणार आहे. डोंबिवली ते ठाणे मार्ग गाठण्या करिता सध्या एक ते सव्वातास लागतो. मात्र आता या प्रकल्पामुळे डोंबिवली ते ठाणे मार्ग फक्त २० मिनटाचा होणार आहे. याच प्रकल्पामूळे नाशिकमध्ये जाण्यासाठी डोंबिवलीकरांना थेट भिवंडी बायपासला जाता येणार आहे. अशी हि गोड बातमी डोंबिवलीकर आणि ठाणेकर यां करिता आहे. हा पूल ३.८ किलो मीटर लांबीचा व ४५ फुट रुंदीचा होणार आहे. त्यामुळे आता या भागातील प्रगतीला वेग मिळणार आहे व तसेच या भागातील वाहतूक सुद्धा सुरळीत होयील.
Source : Marathi Unlimited.