यावरी नामदेव काय बोलला
Like
Like Love Haha Wow Sad Angry

namdevache-abhang5

यावरी नामदेव काय बोलला । आजी मनी संतोष जाला ।
शब्द पूर्वजांचा ऐकिला । आनंदे भरला सागर ।।
परसोबास म्हणे नामा । चरणतीर्थ द्यावें आम्हां ।
तुमचे चरणीनचा महिमा । माझ्या पूर्वजा आतुड्ला ।।
ईतुके दिवस गिवसिता पाहि । परी हे व्यवस्था न पडे ठावी ।
पूर्वज आहे तुझे पायी । तें म्यां आज जाणितले ।।
त्यासी आपुले चरणीं राहविले । म्या पूर्वी काय कर्म केलें ।
त्वां मज वेगळे धरियेलें । थितें अंतरले चरणतीर्थ ।।
ब्राम्हण क्षत्रिय वैश्य समस्त । हे तव तुमच्या पायां पडत ।
त्या दंडवत घडत । दोष जाती तयांचे ।।
एसें ठायींचेंच जाणतो । तरी कासया हिंडतों ।
चरण धरुनीच रहातों । विष्णुदास म्हणे नामा ।।६।।

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu