दिवसेन दिवस समाजात बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. या वर भांडणे घालान्या करिता आपण कटिबद्ध आहोत असे प्रधान मंत्री मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. दिल्लीत एका तरूणीवर सामुहिक बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणा-या दिल्लीकरांच्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशवासीयांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. गेल्या रविवारी राजधानी दिल्लीत वैद्यकशास्त्राच्या एका तरूणीवर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. हररोज अश्या वार्ताह होतच आहे. सरकार या वर काहीच करत नाही, त्यामुळे आता हिंसक वळण येत आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात देशवासीयांचा हा संतापाचा उद्रेक आपण समजू शकत असल्याचे सांगितले. दरम्यान तरूणीवर बलात्कार करणा-यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत निदर्शने करणा-या दिल्लीकरांच्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले.
Source : Marathi Unlimited